२१ वर्षीय तरुणाला गांजासहीत रंगेहात पकडला; सापडला १ कीलो २०० ग्राम गांजा
By पंकज शेट्ये | Updated: September 1, 2023 19:00 IST2023-09-01T18:59:54+5:302023-09-01T19:00:17+5:30
दुचाकीत गांजा घेऊन आला होता तरुण वागणूक संशयास्पद आढळल्याने पोलीसांनी दुचाकीची तपासली

२१ वर्षीय तरुणाला गांजासहीत रंगेहात पकडला; सापडला १ कीलो २०० ग्राम गांजा
वास्को: शुक्रवारी (दि.१) पहाटे दक्षिण गोव्यातील वास्को पोलीसांनी नवेवाडे येथे छापा टाकून एका तरुणाला १ कीलो २०० ग्राम गांजा अमली पदार्थासहीत रंगेहात पकडला. गांजासहीत रंगेहात पकडलेल्या २१ वर्षीय सनी केवट (रा: पिशेडोंगरी, वास्को) याच्याविरुद्ध पोलीसांनी गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ती कारवाई करण्यात आली. एक तरुण नवेवाडे येथील सरकारी विद्यालयासमोर अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहीती पोलीसांना मिळाली. माहीती मिळताच वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रोहन नागेशकर आणि इतर पोलीसांनी त्या तरुणाला गजाआड करण्यासाठी त्याठीकाणी सापळा रचला.
रात्री १.१५ च्या सुमारास एक तरुण तेथे दुचाकीने पोचल्यानंतर त्याची वागणूक संशयास्पद असल्याचे पोलीसांना आढळून आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर आणि इतर पोलीसांनी त्याला पकडून त्याच्या दुचाकी (क्र: जीए ०६ आर १२७०) तपासली असता त्यात १ कीलो २०० ग्राम गांजा अमली पदार्थ असल्याचे पोलीसांना आढळून आले. त्यानंतर पोलीसांनी त्या तरुणाशी चौकशी केली असता त्याचे नाव सनी केवट असल्याचे उघड झाले. गांजासहीत पोलीसांनी सनी केवट याला रंगेहात पकडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी त्याप्रकरणात तक्रार नोंदवली. सनी याच्याकडून पकडलेल्या त्या गांजाची कींमत सुमारे १ लाख २० हजार असावी अशी शक्यता पोलीसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
वास्को पोलीसांनी सनी याच्याविरुद्ध एनडीपीएस १९८५ कायद्याच्या २०(बी)(२)(बी) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयुर सावंत अधिक तपास करित आहे.