म्हापशातील २० लाख चौ.मी. जागा गोठविणार
By Admin | Updated: October 14, 2015 01:28 IST2015-10-14T01:28:48+5:302015-10-14T01:28:59+5:30
पणजी : म्हापशाचा बाह्यविकास आराखडा येत्या दोन महिन्यांत तयार होईल, असे उत्तर गोवा पीडीएचे चेअरमन आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी

म्हापशातील २० लाख चौ.मी. जागा गोठविणार
४ ओडीपी दोन महिन्यांत : लोबो
पणजी : म्हापशाचा बाह्यविकास आराखडा येत्या दोन महिन्यांत तयार होईल, असे उत्तर गोवा पीडीएचे चेअरमन आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. म्हापशातील २० लाख चौरस मीटर जागा शहर विकास योजनेसाठी गोठविली
जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
म्हापशाच्या नियोजित ओडीपीसाठी आम्ही लोकांच्या सूचना व आक्षेप मागितले होते. अनेक प्रकल्पांबाबत व जागांबाबत सूचना आल्या. त्यानंतर पीडीएने नेमलेल्या उपसमितीने म्हापशात एकूण २८० ठिकाणी पाहणी काम केले. आता ओडीपीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत म्हणजे येत्या डिसेंबरपर्यंत ओडीपी तयार होईल, असे लोबो यांनी सांगितले.
म्हापशातील एकाही शेताचे बिगर शेतजमिनीत रूपांतर केले (पान ६ वर)