पित्याकडून २ मुलींची हत्या
By Admin | Updated: December 27, 2015 01:25 IST2015-12-27T01:25:31+5:302015-12-27T01:25:48+5:30
हणजूण : मनोरुग्ण पित्याने दोन चिमुरड्या मुलींची झोपेतच गळा दाबून निर्घृण हत्या केली. किनारपट्टीत नाताळच्या

पित्याकडून २ मुलींची हत्या
हणजूण : मनोरुग्ण पित्याने दोन चिमुरड्या मुलींची झोपेतच गळा दाबून निर्घृण हत्या केली. किनारपट्टीत नाताळच्या जल्लोषी वातावरणात कांदोळी येथे शनिवारी ही घटना घडली. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. या हत्या करण्यापूर्वी झोपेतील पत्नीवर लोखंडी गजाने वार केल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. या अमानुष कृत्यानंतर हा संशयित आरोपी कळंगुट पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेडाच्या भरात संशयिताने मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. फिलीप फर्नांडिस (वय ४२, रा. कांदोळी, ता. बार्देस) असे अटक केलेल्या या नराधमाचे नाव आहे. कॅथरिन (तीन वर्षे) आणि इलिझा (आठ वर्षे) अशी मृत मुलींची नावे आहेत. पत्नी स्वेतलाना यांच्यावर (वय ३८) गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार फिलीप हा गोवेकर आहे. त्याची पत्नी स्वेतलाना (वय ३८) रशियन आहे. दोघांनी २००७ मध्ये प्रेमविवाह केलेला आहे. फिलीप हा नास्तिक आहे. (पान २ वर)