शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

पेडणे-आगरवाडा येथे एटीएम फोडून पळवले १८.३० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:12 IST

एटीएम मशीन पळवून नेऊन ते फोडण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात घडला आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) पेडणे-आगरवाडा येथील भरवस्तीतील आणि मुख्य रस्त्यावर बसवलेले एटीएम मशीन दोन चोरट्यांनी  रिक्षात घालून डोंगरमाथ्यावर नेवून फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये पळवण्याची घटना ८ रोजी पेडणे पोलीस कक्षेत घडली.

पेडणे, दि. 8 - एटीएम मशीन पळवून नेऊन ते फोडण्याचा प्रकार उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात घडला आहे. भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) पेडणे-आगरवाडा येथील भरवस्तीतील आणि मुख्य रस्त्यावर बसवलेले एटीएम मशीन दोन चोरट्यांनी  रिक्षात घालून डोंगरमाथ्यावर नेवून फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये पळवण्याची घटना ८ रोजी पेडणे पोलीस कक्षेत घडली. मागील महिन्या भरात गोव्यात घडलेला हा दुसरा प्रकार आहे. 

आगरवाडा येथील मुख्य रस्त्यावर एसबीआयचे एटीएम होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन चोरटे दुचाकी वाहनातून आले असावेत त्यांनी अगोदर पार्से येथे  रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेली जीए ११ टी १४४८  ही रिक्षा चोरट्याने डायरेक्ट चावी नसताना स्टार्ट केली, त्यात मशीन घातले. हे मशीन केवळ दोन लोखंडी हूकवर बसवले होते. चोरट्यांनी लोखंडी सळीचा वापर करून हे मशीन हटवले आणि रिक्षात घातले. चोरट्यांनी रिक्षातून हे मशीन बोडकेधेनू डोंगर माळावर ज्या चिरे खाणी होत्या त्या ठिकाणी नेले. भले मोठे मशीनवर दगड घालून ते फोडण्यात आले आणि त्यातील पैसे पळवले रिक्षा नंतर मुख्य रस्त्यावर आणून ठेवली आणि ते आपल्या दुचाकीवरून पळून गेले. या एटीएमकडे सुरक्षा रक्षकाची नेमणूक न केल्याने चोरट्यांचे आयतेच फावले. 

पोलिसाना सीसीटीव्हीद्वारे फुटेज मिळालेली आहे. त्यामुळे चोरटे सापडण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, पोलीस अधीक्षक महेश गावकर, पेडणे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अनंत गावकर यांनी लागलीच उपस्थिती लावली. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरीचा गुन्हा नोंदवला. 

पार्से येथील ज्या मालकाची रिक्षा चोरण्यात आली होती त्याने सकाळी उठून पाहिले तर आपली रिक्षा जाग्यावर नाही सैरभैर होऊन त्यांनी तिचा शोध घेतला. त्याचवेळी पोलीस आगरवाडा दिशेने जात होते त्याने पाठलाग करून तो रिक्षा मालक चोरी झालेल्या एटीएमकडे पोचले व आपली रिक्षा चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. कुणीतरी त्याला सांगितले की तुझी रिक्षा बोडकेधेनू रस्त्याकडे असल्याची माहिती दिली. तिथे पोलीसही गेले. सदरच्या ठिकाणी डोंगराळ भागात मशीन सापडले. तत्पूर्वी श्वानपथक घटनास्थळी व ठसेतज्ज्ञ आपले काम करीत होते. 

आगरवाडा किंवा इतर ठिकाणी जी एटीएम कार्यालये असतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केलेले नसतात. पेडणे तालुक्यात ही प्रथमच एवढी मोठी चोरी होण्याची घटना घडलेले आहे त्यामुळे जनता भयभीत झाली. चोरट्यांनी चोरी करताना बरीच प्रगती करून घटनास्थळी मशीन फोडण्या पेक्षा ती उभारून दूर ठिकाणी फोडणे शक्कल लढवलेली आहे. त्यामुळे पेडणे पोलिसांची या चोरीने झोप उडवली. घटनास्थळीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षकाना यावे लागते.  बँक आणि एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही सुरक्षा नसल्याने हा प्रकार घडलेला आहे.

पोलीस निरीक्षक उत्तम राऊत यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसाना फुटेज मिळालेली आहे. त्यातून चोरांचा तपास लावला जातील असे ते म्हणाले. चोरटे जर बुरखे घालून आले तर चोरीचा तपास लावणे कठीण आहे. आॅगस्ट महिन्यात फोंडा तालुक्यातून एटीएम मशीन चोरुन नेण्याचा व नंतर ते पाण्यात टाकून देण्याचा प्रकार घडला होता.