गोव्यात १८२ कि. मी. अंतर्गत जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण
By Admin | Updated: July 18, 2016 21:16 IST2016-07-18T21:16:22+5:302016-07-18T21:16:22+5:30
राज्यात तब्बल १८२ किलोमिटर सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलमार्ग आणि जहाजोद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत

गोव्यात १८२ कि. मी. अंतर्गत जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १८ - राज्यात तब्बल १८२ किलोमिटर सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलमार्ग आणि जहाजोद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
विस्तृत प्रकल्प अहवालांच्या आधारे विविध जलमार्गांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतर्गत नद्या तसेच सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध अहवाल आणि पर्यावरणावर परिणाम यांचे मूल्यांकन, राष्ट्रीय जलमार्ग ६८ आणि राष्ट्रीय जलमार्ग १११ साठी वन्यजीव अभ्यास समितीच्या मंजुरीचा विचार करण्यात आला असल्याचे राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय जलमार्ग कायदा २0१६ अंतर्गत गोव्यात ज्या सहा जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण होणार आहे त्यात खालील जलमार्गांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकरणामुळे अंतर्गत जलमार्गांवर विकासाचा मार्ग खुला होणार आहे.
मांडवी नदी - रेइश मागुश येथील दर्यासंगम ते उसगांव पूल (४१ कि. मी.)
झुवारी नदी - मुरगांव बंदर ते सावर्डे पूल (५0 कि. मी.)
शापोरा नदी - मोरजी दर्यासंगम ते मणेरी (३३ कि. मी.)
कुंभारजुवें नदी - कुंभारजुवे व झुवारी नदी संगम (कुठ्ठाळी) ते कुंभारजुवे व मांडवी नदी संगम (१७ कि. मी.)
म्हापसा नदी - म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पूल ते म्हापसा व मांडवी नदी संगम (पर्वरी) (२७ कि. मी.)
साळ नदी - देवसा पूल ते मोबोर येथील दर्यासंगम (१४ कि. मी.)