शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशभरातील १५६ खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोव्यात, २६ ऑक्टोबरपासून रंगणार थरार

By समीर नाईक | Updated: October 17, 2023 18:06 IST

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले स्वागत

समीर नाईक, पणजी: राज्यात २६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातील सुमारे १५६ खेळाडू मंगळवारी राज्यात दाखल  झाले आहेत. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या खेळाडूंचे दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले, गावडे यांच्यासोबत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर हे, व क्रीडा खात्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जसे जसे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचे सामने जवळ येत आहे, तसे तसे त्या त्या क्रीडा प्रकारात आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू राज्यात दाखल होणार आहे. सध्या जे खेळाडू आले आहेत, ते दाबोळी विमानतळ आणि मडगाव येथून रेल्वे मार्गे आले आहेत, असे गावडे यांनी यावेळी सांगितले. १९ रोजी बॅडमिंटन खेळापासून  ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू होत आहे. त्यानंतर तलवारबाजी आणि व्हॉलीबॉल होईल, असेही गावडे यांनी यावेळी सांगितले. 

कला आणि संस्कृती खात्या तर्फे खेळाडूंचे ढोल ताश्यांच्या गजरात आणि फुलांनी स्वागत करण्यात आहे, यापुढे देखील जे खेळाडू राज्यात दाखल होईल त्यांचेही असे स्वागत करण्यात येईल. या स्पर्धेच्या पार्श्वूमीवर महनीय व्यकी, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक व इतरही राज्यात दाखल होणार आहे, असे गावडे म्हणाले.

२६ ऑक्टोबरपर्यंत फातोर्डा येथील नेहरू स्टेडियम उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होणार असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित असतील, असे गावडे यांनी पुढे सांगितले. अंतिम टप्प्यातील काम, किरकोळ बदल इत्यादींसाठी आम्ही २ दिवसांचा मोकळा वेळ ठेवला आहे. कांपाल येथील क्रीडा नगरी २४ ऑक्टोबरपर्यंत तयार होणार आहे. आम्ही सगळ्या एजन्सींना, स्मार्ट सिटी, पीडब्ल्यूडी, मलनिस्सारण महामंडळ, जीएसआयडीसी यांनाही सूचना दिली आहे की २५ ऑक्टोबरपासून रस्ते खोदकामासारखी कामे स्थगित ठेवावी, असही त्यांनी सांगितले.

"आमचे अधिकारी अथकपणे पूर्णवेळ काम करत आहेत. आम्ही हे आयोजन सफलरीत्या व्हावे यासाठी अथक मेहनत घेत आहोत. सर्व सुरळीतपणे होण्यासाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही गावडे म्हणाले.

टॅग्स :goaगोवा