१५00 भाविक श्रीलंकेला रवाना

By Admin | Updated: January 12, 2015 01:54 IST2015-01-12T01:47:57+5:302015-01-12T01:54:09+5:30

गोव्याचे सुपुत्र जोसेफ वाझ यांना संतपद बहाल करण्याचा सोहळा

1500 pilgrims leave for Sri Lanka | १५00 भाविक श्रीलंकेला रवाना

१५00 भाविक श्रीलंकेला रवाना

पणजी : गोव्याचे सुपुत्र जोसेफ वाझ यांना पोप फ्रान्सिस यांच्या हस्ते संतपद बहाल करण्याच्या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गोव्यातून १५00 भाविक शनिवारी श्रीलंकेला रवाना झाले. गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार ग्लेन टिकलो यांचा यात समावेश आहे.
वाझ यांना संतपद जाहीर झाल्यापासून गोव्यातील भाविक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात होते. नावेलीच्या अवर लेडी आॅफ परपेच्युअल सुकूर कॉन्व्हेंटच्या तसेच सांकवाळ येथील होली फॅमिलीच्या नन्स याही लंकेला गेल्या आहेत. एका भाविक महिलेने सांगितले की, तिचे नाव या सोहळ्याला जाण्यासाठी फादर एरेमित रिबेलो यांनी सुचविले. आज या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जाताना फार आनंद होत आहे, असे ती म्हणाली.
(प्रतिनिधी)

Web Title: 1500 pilgrims leave for Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.