शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या सरकारी रुग्णालयात दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:39 IST

राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

पणजी : राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात  (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. याशिवाय पाचशे हृदयरोगविषयक अन्य शस्त्रक्रिया पार पडल्या. यात गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्णांवरही झालेल्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. शिरीष बोरकर यांनी ही माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी येथे दिली. गोमेको हे आशिया खंडातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात असताना ते सुरू झाले होते. देशातील कोणत्याच सरकारी रुग्णालयात ज्या सुविधा पहायला मिळत नाहीत त्या सगळ्या गोव्यातील या सरकारी रुग्णालयात आहेत. त्यामुळेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही रूग्ण येथे येतात.

तीन वर्षांपूर्वी गोमेकोमध्ये हृदयरोग शस्त्रक्रियांचा सुपरस्पेशालिटी विभाग सुरू झाला. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत आहे. दीड महिना रुग्णांना प्रतीक्षेत रहावे लागते. बुधवारी तेरा खाटांचा पोस्ट आॅपरेशन अतिदक्षता विभाग गोमेकोमध्ये सुरू करण्यात आला. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी दीड महिन्यावरून एक महिन्यापर्यंत कमी होईल, असे गोमेको इस्पितळाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. हृदयरोगविषयक पदवी शिक्षणाचा अभ्यासक्रम येत्या वर्षांपासून गोमेकोमध्ये सुरू केला जाईल असे डीन डाॅ. प्रदीप नाईक यांनी सांगितले.

दरम्यान हृदयरोगविषयक प्राथमिक उपचार तरी जलदगतीने व्हावेत म्हणून पाच कार्डियाक रूग्णवाहिका सरकार सुरू करणार आहे. राज्यात हृदयरोगाचा धक्का बसण्याचे प्रकार वाढत आहेत. तरुणांमध्येही अलिकडे असे रूग्ण सापडतात असे आरोग्य  मंत्री राणे यांनी सांगितले. पाच रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी एक  हृदयविषयक ज्ञान असलेला डाॅक्टर नियुक्त केला जाईल. गोव्यात असे डाॅक्टर मिळत नसल्याने परप्रांतामधून डाॅक्टर आणले जातील असे मंत्री राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाHealthआरोग्य