१५ लाखांचे सोने जप्त
By Admin | Updated: July 20, 2015 01:14 IST2015-07-20T01:14:30+5:302015-07-20T01:14:43+5:30
वास्को : रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ठाणे, मुंबई येथील मोटे श्याम शकील अहमद या प्रवाशाकडून सुटकेसमधील

१५ लाखांचे सोने जप्त
वास्को : रविवारी पहाटे दाबोळी विमानतळावर केंद्रीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ठाणे, मुंबई येथील मोटे श्याम शकील अहमद या प्रवाशाकडून सुटकेसमधील विविध भागांत लपवून ठेवलेले ५३९ ग्रॅम वजनाचे १५ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात यश मिळविले. केंद्रीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोटे श्याम शकील अहमद हा रविवारी पहाटे शारजाहून एअर अरेबिया विमानातून दाबोळी विमानतळावर उतरला होता. कस्टम अधिकाऱ्यांनी संशयावरून त्याच्या साहित्याची झडती घेतली असता सुटकेसची चाके, हॅँडल व इतर भागांत लपविलेले सोने सापडले. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला त्वरित अटक करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले. दाबोळीवर महिनाभरात कित्येक कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)