१४ एचआयव्ही बाधीत मुलांच्या प्रवेशास शाळा तयार

By Admin | Updated: June 23, 2014 01:38 IST2014-06-23T01:29:29+5:302014-06-23T01:38:01+5:30

वादाचा सुखांत : गैरसमजामुळे पालकांमध्ये होती भीती

14 Schools prepared for admission to HIV infected children | १४ एचआयव्ही बाधीत मुलांच्या प्रवेशास शाळा तयार

१४ एचआयव्ही बाधीत मुलांच्या प्रवेशास शाळा तयार

केपे : केपे तालुक्यातील चौदा एचआयव्ही बाधीत विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेण्याची तयारी या परिसरातील एका शाळेने दाखवली आहे. त्यामुळे या वादग्रस्त विषयावर पडदा पडला. या आई-वडील नसलेल्या १४ मुलांना सामावून घेणाऱ्या जांबावली येथील एका नन्स होम समोर ही बिकट समस्या निर्माण झाली होती. या आश्रमात असलेल्या चोवीस विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेण्यासाठी जवळच्या विद्यालयांनी नकार दिला होता. या चाळीसपैकी चौदा विद्यार्थी एचआयव्ही बाधीत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत घेतल्यास आम्ही आमच्याही पाल्यांना शाळेबाहेर काढू, असा इशारा पालकांनी दिला होता. त्यामुळे ही समस्या बिकट झाली होती.
या संदर्भात जांबावलीच्या नन्स होमकडे संपर्क साधला असता या मुलांना शाळेत घेण्याची शाळा व्यवस्थापनाने तयारी दाखवली आहे. त्यामुळे हा प्रश्न निकालात लागला आहे, अशी माहिती सिस्टर आफोन्सो यांनी दिली. परत काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून या शाळेचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. एचआयव्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात भेदभाव करू नये, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिला आहे. त्यामुळे या मुलांना सर्वसाधारण मुले शिकत असलेल्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय नन्स होमने घेतला होता. यापूर्वी ही मुले त्या नन्स होममध्येच शिकत होती.
एचआयव्ही बाधीत मुलांनी सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण घेतल्यास या व्याधीचा आपल्या मुलांना प्रादुर्भाव होईल, अशी भीती या पालकांना होती. याचे कारण एचआयव्ही संदर्भात फारशी माहिती या पालकांना नव्हती, त्यामुळे त्यांनी या प्रयत्नाला विरोध केला होता. या मुलांना सर्वसाधारण मुलांबरोबर शिक्षण दिल्यास कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, हे समजावून सांगण्यात आले. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश काकोडकर, तसेच असोसिएशन आॅफ पीस
अ‍ॅण्ड जस्टीज फादर नेवरीक यांनी पालकांशी संवाद साधला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 14 Schools prepared for admission to HIV infected children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.