शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

१४ कोटींचे पर्यटन प्रकल्प रद्द; केंद्रास निधी परत

By admin | Updated: January 18, 2015 01:41 IST

पणजी : गोव्याला पाच वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी दिलेला निधी पूर्वीच्या (म्हणजे काँग्रेस) सरकारने वापरलाच नाही. उलट हा निधी अन्यत्र वळवला.

पणजी : गोव्याला पाच वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी दिलेला निधी पूर्वीच्या (म्हणजे काँग्रेस) सरकारने वापरलाच नाही. उलट हा निधी अन्यत्र वळवला. आता जे प्रकल्प राबविणे शक्य नाही असे चौदा कोटींचे तीन प्रकल्प आम्ही रद्द करून त्यासाठीचा निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयास परत पाठवणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मडगाव येथे मिनी कन्व्हेंशन सेंटरसाठी सहा कोटी रुपयांचा निधी आला होता. चिंबल येथे ‘गोवा हट’ प्रकल्पासाठी चार कोटींचा निधी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिला होता. पणजीत ‘स्काय वॉक’ प्रकल्पासाठी आणखी चार कोटी रुपये मंजूर होऊन आले होते. या प्रकल्पांसाठीचा निधी पूर्वीच्या सरकारने अन्य कामांसाठी वापरला. आम्ही हे प्रकल्प रद्द करत आहोत; कारण ते उभे करण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. केंद्राकडून नवा निधी येण्यासाठी अगोदर या तीन प्रकल्पांसाठीचा निधी परत पाठविणे किंवा विनियोग प्रमाणपत्र केंद्रास सादर करणे गरजेचे आहे, असे काब्राल यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या उपस्थितीत सांगितले. राज्य सरकार स्वत:च्या तिजोरीतून चौदा कोटी रुपये काढून ते केंद्राला परत करील. त्यानंतर आम्ही सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात उभे करणार आहोत, असे काब्राल म्हणाले. ४५0 कोटींच्या प्रकल्पांचे प्रस्ताव आम्ही केंद्रास सादर केले आहेत. गोवा हे थेट विमान सेवेचे केंद्र व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. दाबोळी विमानतळावर थेट विदेशातून येणाऱ्या विमानांसाठी सात रिकामे स्लॉट्स आहेत. ते आम्हाला उपलब्ध होणार आहेत, असे काब्राल यांनी सांगितले. विमानांसाठी वेळेत सवलत देण्याची मागणी आम्ही केली असून ती देखील मान्य होईल, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)