११0 केव्ही वीजवाहिनी तुटली

By Admin | Updated: May 21, 2014 02:01 IST2014-05-21T01:59:58+5:302014-05-21T02:01:20+5:30

थिवी वीज उपकेंद्रातून येणारी ११0 केव्ही वीजवाहिनी सोमवारी मध्यरात्री जोरदार वार्‍या पावसात तुटून पडल्याने बार्देसमधील बराच भाग अंधारात राहिला.

110 kV power channel broken | ११0 केव्ही वीजवाहिनी तुटली

११0 केव्ही वीजवाहिनी तुटली

 थिवी वीज उपकेंद्रातून येणारी ११0 केव्ही वीजवाहिनी सोमवारी मध्यरात्री जोरदार वार्‍या पावसात तुटून पडल्याने बार्देसमधील बराच भाग अंधारात राहिला. पर्वरीत सुमारे चार तास वीज गुल झाल्याने रहिवाशांना सलग दुसरी रात्रही असह्य उकाड्याने तळमळून काढावी लागली. सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जोरदार वारा आणि गडगडाटासह पर्जन्यवृष्टी झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला तो पहाटे ५ वाजता पूर्ववत् झाला. दुसर्‍या रात्रीही वीज गायब झाल्याने लोक उकाड्याने हैराण झाले. रविवारी रात्रीही वीजवाहिनीचे एक सर्किट निकामी झाल्याने पर्वरीत तब्बल सहा तास वीज खंडित झाली होती. मंगळवारी सायंकाळी राजधानी शहरातही तासभर पुरवठा खंडित झाला होता. वीज खात्याचे अभियंता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तुटलेली ही वीजवाहिनी दुरुस्त करून राजधानी शहराचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. राजधानी शहरासह पर्वरी व परिसरात मध्यरात्री १.१५ च्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाने दमदार हजेरी लावली. वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकारही घडले. वीज खात्याची मान्सूनपूर्व कामे फ्लॉप ठरल्याचे त्यामुळे स्पष्टपणे दिसून आले. मंगळवारीही कमालीचा उष्मा होता. विजेच्या लपंडावामुळे लोकांना घामाच्या धारा लागल्या. सध्या ढगाळ हवामान असून आगामी २४ तासांत काही भागात पावसाच्या किरकोळ सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कमाल तापमान ३१.८ डि. सें. इतके नोंद झाले आहे. आर्द्रता सकाळी ८.३0 वाजता ९६ टक्के इतकी होती. मान्सून रविवारी अंदमानमध्ये दाखल झाला असून गोव्यातही पोषक वातावरण असल्याने वेळेत तो दाखल होईल, असा अंदाज आहे.

Web Title: 110 kV power channel broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.