शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पुन्हा सत्तेचे राजकारण जोरात, काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांना भेटणार असल्याचा भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:51 IST

हे आमदार कोण आहेत असे विचारले असता राणे यांनी ‘मेळाव्याच्या दिवशी तुम्हीच पहा’ असे पत्रकारांना सांगितले.

पणजी: काँग्रेसचे दोन आमदार हे भाजपच्या संपर्कात असून रविवारी गोव्यात येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही ते भेट घेणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले आहे. भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, की ‘मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आरोग्याच्या कारणावरून विदेशात उपचारासाठी असताना काँग्रेसकडून अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. सरकार स्थापन करण्याची संधी राज्यपालांकडे मागणाऱ्या काँग्रेसने आपल्या आमदारांवरच अगोदर लक्ष्य ठेवावे. काँग्रेसचे किमान दोन आमदार हे भाजपच्या संपर्कात असून १३ मे रोजी गोव्यात येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही ते भेट घेणार आहेत.हे आमदार कोण आहेत असे विचारले असता राणे यांनी ‘मेळाव्याच्या दिवशी तुम्हीच पहा’ असे पत्रकारांना सांगितले. आपल्याला जी माहिती आहे तीच आपण सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कॉंग्रेसने उगाच आपली शक्ती इकडे तिकडे वाया घालविण्याऐवजी आपल्याच पक्षासाठी खर्च करावी असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे नेते रमाकांत खलप यांच्यावरही त्यांनी टीका केली. खलप यांनी कायदा पुन्हा समजून घेण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. त्यांना आपल्याच मतदारसंघातील मतदारांनी नाकारल्यामुळे ते कधी आमदार बनु शकले नसल्याचाही टोला त्यांनी हाणला. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस