नवी दिल्ली : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत परदेशात पर्यावरणपूरक गणेशाचे स्वागत केले जाते आहे. शिवाय सामाजिक भान राखत गरजूंना मदतीबरोबरच सामाजिक संस्थांनाही मदतीचा हातभार लावताना दिसत आहे. अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळ आणि फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हलने ही सामाजिक बांधिलकी जपली आहे.शार्लट मराठी मंडळामार्फत हिंदू सेंटरच्या पुढाकाराने अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. हातानी केलेली मूर्ती, व्यावसायिक आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी केलेले मदतीचे आवाहन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य.गेले अडतीस वर्षापासून अमेरिकेत हिंदू सेंटरमार्फत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात हिंदू सेंटरचे अप्पा जोशी आणि गीता जोशी यांच्या नि:स्पृह सेवेचे खूप महत्व आहे. यावर्षी शार्लट मराठी मंडळामार्फत महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.कोल्हापूर आणि जवळपास पुराने मध्यंतरी थैमान मांडले होते. तेथील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे, असे आवाहन केल्यानंतर महाप्रसादादरम्यान शार्लट मराठी मंडळामार्फत दान पेटी ठेवण्यात आली. त्यात अनेकांनी मदत जमा केली. ही मदत कोल्हापूरातील मराठी बांधवांना पोहोचवण्यात येणार आहे.फिलाडेल्फियातही मोदकात विराजमान गणेशोत्सवफिलाडेल्फिया येथेही फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हल या संस्थेमार्फत गेली पंधरा वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबत यावर्षी सपोर्ट अ चाईल्ड या संस्थेला मदतीचा हात देण्यात येत आहे.फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हलमार्फत दर वर्षी येथे बाप्पाच्या स्थापनेसाठी वेगवेगळी सजावट करण्यात येते. मोदकात विराजमान झालेला बाप्पाची मूर्ती यावर्षीचे आकर्षण ठरली आहे. लवचिक पट्या, कागद आणि कपड्यापासून हा मोदक बनवला गेला आहे.जवळजवळ २०० हुन अधिक अनिवासी भारतीयांनी येथील गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आहे.जवळपास दहा दिवस साजरा होत असलेल्या या गणेशोत्सवासाठी ४ महिने आधी वेगवेगळ्या १५ समिती कार्यरत असतात. यामध्ये येथील पुढच्या पिढीचाही खूप मोठ्ठा सहभाग असतो.हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करतानाही फिलाडेल्फिया गणपती उत्सव समितीने पर्यावरणासाठी अनुकूल असे पर्याय शोधून गो ग्रीनच्या माध्यमातून विविध या कार्यक्रम सादर केले. दहाही दिवस रोज धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. रोज गणपतीच्या मूळमूर्तीवर अभिषेक आणि नंतर फुलांचा, फळांचा, भाज्यांचा, नाण्यांचा, चंदनाचा वापर करुन वेगवेगळे अलंकार केले जातात. शनिवारी महाअभिषेक आणि रविवारी गणेश विवाह असे कार्यक्रम आयोजित केले जातात.रविवारी मुद्रा डान्स फेस्टिवलमध्ये जवळपासच्या गावातून नृत्य प्रशिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी आपली संगीत सेवा सादर करतात. फिलाडेल्फिया गणेश फेस्टिवलने गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन मायदेशातील सपोर्ट अ चाईल्ड या नॉन प्रॉफिट संस्थेसाठी हातभार लावला आहे. यावर्षी आरोग्य आणि शिक्षण या विषयावर काम करणाऱ्या संस्थेसाठी हातभार लावण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या पिढीमध्ये ही गिव्हिंग बॅक टू कम्युनिटी ही संकल्पना आणि शिकवण रुजण्यात मदत होणार आहे.
Ganpati Festival-परदेशातील गणेशोत्सवाने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:29 IST
अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळ आणि फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हलने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
Ganpati Festival-परदेशातील गणेशोत्सवाने जपली सामाजिक बांधिलकी
ठळक मुद्देअमेरिकेतील शार्लट मराठी मंडळाचा पूरग्रस्त कोल्हापूरकरांना मदतीचा हातफिलाडेल्फियातील मंडळाचीही सपोट अ चाईल्ड संस्थेला मदत