शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

विद्यार्थ्यांना जि.प. शाळेत पाठविण्यास पालकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:32 AM

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही.

ठळक मुद्देनियमित शिक्षकांची मागणी : गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांची शाळेला भेट, सकारात्मक आश्वासनानंतर पालक नमले

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत मेंढाटोला केंद्रात येणाऱ्या कटेझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक नियमित शाळेत नसल्याच्या मुद्यावर पालकांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. जोपर्यंत या शाळेला नियमित शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार पालकांनी केला आहे.कटेझरी येथील जि.प.प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यापैकी एकच शिक्षक नियमित शाळेत असतो. एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळणे व अध्यापन करणे कठीण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनियमित शिक्षकांमुळे अभ्यासक्रम सुध्दा पूर्ण होत नाही. या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार माहिती देऊन सुध्दा कोणतीच कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांसह पालक व ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.या इशाराची दखल घेऊन व विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नसल्याची माहिती मिळताच शुक्रवारी गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांनी शाळेला भेट देऊन समितीचे पदाधिकारी व पालकांशी चर्चा केली. नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी प्रभारी व तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक न देता नियमित शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी समितीचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे. जोपर्यंत शिक्षक नियमित शाळेत येणार नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार पालकांनी व्यक्त केला. शुक्रवारी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविल्यामुळे शाळा परिसरात शुकशुकाट होता.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी