शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:41 IST

भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरविणाऱ्या हुकुमशाही भाजप सरकारला आता युवापिढीने धडा शिकवावा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.बुधवारी स्थानिक चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनात युवक काँग्रेसची बैठक घेण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रकाश ईटनकर, माजी आ.पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, युकाँचे निरीक्षक केतन रेवतकर, युकाँचे प्रदेश सचिव इशात शेख, महासचिव तन्वीर विद्राही, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, सुदाम मोटवानी, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, जि.प.चे गटनेते मनोहर पोरेटी, जिल्हा महासचिव समशेर खॉ पठाण, युवा नेते विश्वजीत कोवासे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहेरी विधानसभा अध्यक्ष स्व.परसा महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पुढाºयांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र केंद्र सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. राज्य सरकारही सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेची फसवणूक झाली. देशात शांतता, अखंडता कायम राहून सर्व जाती, धर्माच्या बांधवांचा विकास होण्यासाठी युवक काँग्रेसच्या संघर्षाला लोकांनी साथ दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. १८ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जनसंपर्क यात्रा गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तांबे यांनी केले. याप्रसंगी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले.मेळाव्याला प्रभाकर वासेकर, मुस्ताक हकीम, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, डी.डी.सोनटक्के, काशिनाथ भडके, गौरव अलाम, प्रतिक बारसिंगे, अभिजीत धाईत, अधीर इंगोले, तौफिक शेख, दीपक ठाकरे, मिलिंद किरंगे, उमेश पेडुकर, सुभाष धाईत, मोहन नामेवार, योगेश नैताम, वैभव कडस्कर, गौरव येनप्रेड्डीवार, विजय अमृतकर, विवेक ढोंगळे, राकेश परसा, कौसर खान, सामय्या कडवे, रजाक पठाण आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस