शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:09 IST

रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणा-या रिकाम्या जागेतून दुस-या प्लॅटफॉर्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली

देसाईगंज (गडचिरोली) : रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणा-या रिकाम्या जागेतून दुस-या प्लॅटफॉर्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली अन् संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून पुढे निघून गेली. तरीही त्या युवकाला थोडी जखमही झाली नाही. हृदयाचे ठोके चुकविणारी ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी वडसा रेल्वे स्थानकावर घडली.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवासी उडाणपुलावरून न जाता शॉर्टकट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.फलाट क्रमांक १ वर गोंदियाला जाणारी पॅसेंजर तर फलाट क्रमांक २ वर गोंदिया-बल्लारशहा डेमो उभी होती. तिस-या फलाटावर रेल्वेगाडी उभी होती. पॅसेंजर पकडण्यासाठी तीन युवकांनी मालगाडीच्या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन तरूण रेल्वेडब्यांना जोडणा-या जोडांवर उभे झाले. त्यामुळे तिस-या युवकाने जॉइंटच्या खालच्या बाजूने जाऊन रूळ पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मालगाडी सुरू झाल्याने दोन डब्यांच्या जोडावर उभे असलेल्या युवकांनी कसेतरी फलाटावर उड्या मारून स्वत:चे प्राण वाचविले, मात्र खालून जाणा-या युवकापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. यावेळी त्या युवकाने समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न करता दोन रूळांच्या मध्ये समांतर झोपला. यामुळे मालगाडीचे अनेक डबे त्याच्या अंगावरून धडधडत पुढे निघून गेले. मात्र त्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही. मालगाडी निघून गेल्यानंतर भयभित झालेल्या युवकाने रेल्वे स्थानकावरून पळ काढला. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. हा चित्तथरारक प्रसंग काही रेल्वेप्रवाशांनी मोबाईलच्या कॅमे-यात कैद केला.उड्डाणपुलाचा वापर कराफलाट ओलांडण्यासाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविले आहेत. मात्र अनेक वेळा प्रवाशी त्याचा वापर न करता खालूनच रेल्वे रुळावरून पलिकडे जातात. परिणामी अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणे बेकायदेशीर आहे. प्रवाशांनी उड्डाण पुलावरूनच फलाट ओलांडावा, असे आवाहन देसाईगंजचे स्टेशनमास्टर संजयकुमार सिंग यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केले आहे.