युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:55 AM2018-11-01T00:55:59+5:302018-11-01T00:57:36+5:30

भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले.

Youth Congress's Prohibition Movement | युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

Next
ठळक मुद्देविविध योगासने : सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रशांत आखाडे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मिलींद बागेसर, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, उमेश कुळमेथे, आशिष कन्नमवार, विश्वजित कोवासे, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, प्रकाश मोहुर्ले, निखील खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, तौफिक शेख, राकेश गणवीर, एजाज शेख, महेश जिल्लेवार, राकेश गिरसावळे, कमलेश खोब्रागडे, एनएसयूआयचे अधीर इंगोले, वैभव कडस्कर तसेच सूरज मडावी, योगेश नैताम, फारूख अली, नीलेश मेश्राम, विजय वागुलकर, पंकज बारसिंगे, प्रकाश खेडेकर आदी उपस्थित होते.
सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; जनतेचा भ्रमनिरास- नामदेव उसेंडी
भाजपच्या पदाधिकाºयांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही या सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. भाजपप्रणीत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी यावेळी भाषणातून केला. विद्यमान सरकारची कर्जमाफी योजना पूर्णत: फसली असून सरकारच्या या धोरणाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे, असेही डॉ.नामदेव उसेंडी यावेळी म्हणाले.

Web Title: Youth Congress's Prohibition Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.