गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा येथील काही मजूर काम करण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. त्यांना युवक काँग्रेसने अन्नधान्याची मदत केली. यामुळे सहा मजुरांच्या कुटुंबाला मोठी मदत झाली.
कोरोनामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे अन्नधान्याची त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. ही बाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाली. याची दखल घेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना तांदूळ, डाळ, तेल व इतर आवश्यक साहित्य दिले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, विनोद धंदरे, हेमंत मोहितकर, तोफिक शेख, संदीप ठाकरे, रवी गराडे, छत्रपाल भोयर, घनश्याम गोहणे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.