शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
2
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
3
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
4
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
5
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
7
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
8
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
9
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
10
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
11
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
12
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
13
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
14
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
15
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री
16
नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस
17
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
18
५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?
19
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
20
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

दुर्गम भागात ‘आपली कन्या आपल्या भेटी’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

लाहेरीचा परिसर जंगलव्याप्त व नक्षलप्रभावित आहे. या परिसरातील पुरूष वर्ग तालुका स्थळी किंवा लाहेरीसारख्या ठिकाणी विविध कामासाठी येतात. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी थोडेफार माहित आहे. मात्र महिलावर्ग चूल, मूल व शेतीची कामे यातच गुंतून राहतात. त्यामुळे या महिलांना बाहेरच्या जगाविषयी माहिती नाही.

ठळक मुद्देसमस्या जाणल्या : लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या महिला पोलिसांनी मुरंगल गावातील महिलांसोबत खेळले खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : दुर्गम भागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलिसांनी ‘आपली कन्या आपल्या भेटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी लाहेरीपासून आठ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भाग असलेल्या मुरंगल या गावी जाऊन महिलांची समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्यासोबत पारंपारिक खेळ खेळून त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.लाहेरीचा परिसर जंगलव्याप्त व नक्षलप्रभावित आहे. या परिसरातील पुरूष वर्ग तालुका स्थळी किंवा लाहेरीसारख्या ठिकाणी विविध कामासाठी येतात. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी थोडेफार माहित आहे. मात्र महिलावर्ग चूल, मूल व शेतीची कामे यातच गुंतून राहतात. त्यामुळे या महिलांना बाहेरच्या जगाविषयी माहिती नाही. तसेच आरोग्य विषयकही फारशी जनजागृती नाही. अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक विकास खुंटला आहे. कुटुंबाच्या गाड्याचा महिला हा महत्त्वाचा चाक आहे. मात्र हा चाक कमजोर असल्याने संसाराचे गाडे चालविताना अडचणी निर्माण होतात. महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने ‘आपली कन्या, आपल्या भेटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लाहेरी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारूद्र परजने, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट स्वागत कैलास तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या टिमने मुरंगल गावाला भेट दिली. महिलांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत महिला कर्मचऱ्यांनी संगीत खुर्ची हा खेळ खेळला. पोलीस कर्मचारी आपल्यासोबत खेळत असल्याचे बघून महिलांचा आनंद द्विगुणीत झाला. काही समस्या असल्यास पोलिसांना कळवावे. पोलीस ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील, असे आश्वासनही पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी वैशाली चव्हाण, रेश्मा गेडाम, शोभा गोदारी, सोनम लांजेवार, कल्लु मेश्राम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस