ऑनलाईन लोकमतगडचिरोली : युवा हाच भारत देशाचा भावी नेता आहे. त्यामुळे भाजपमधील युवा कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेचे काम जोरात करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केले.स्थानिक सर्किट हाऊसमध्ये शनिवारी भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, जिल्हा महामंत्री भारत बावणथडे, सुनील नंदनवार, विशेष जोशी, सुधीर सपाटे, पंकज खरवडे, प्रमोद झिलपे, चांगदेव फाये, अहेरी विधानसभा क्षेत्राचे अल्पसंख्यांक प्रमुख रियाज शेख आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. नेते यांनी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील युवा मोर्चा आघाडीच्या कामाचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोणातून विद्यमान शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवा कार्यकर्त्यांनी काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:11 IST
युवा हाच भारत देशाचा भावी नेता आहे. त्यामुळे भाजपमधील युवा कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेचे काम जोरात करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी केले.
युवा कार्यकर्त्यांनी काम करावे
ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : गडचिरोलीत भाजपच्या युवा मोर्चाची बैठक