शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण अभियंता ठार, हेल्मेटचा भुगा, पाय धडावेगळा

By संजय तिपाले | Updated: May 16, 2024 21:35 IST

देसाईगंज येथील घटना, पित्याचा घातपाताचा आरोप

गडचिरोली: आरमोरीवरून देसाईगंजकडे निघालेल्या तरुण अभियंत्यास वडसा वनविभाग कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने धडक दिली.ही धडक एवढी जबर होती की त्याचा उजवा पाय धडावेगळा झाला तर हेल्मेटचाही अक्षरश: भुगा झाला. ही हृदयद्रावक घटना १६ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली.

श्रीकृष्ण राजकुमार वंजारी (२८,रा.पवनी जि.भंडारा) असे त्या दुर्दैवी अभियंत्याचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. १६ रोजी तो दुचाकीवरुन (एमएच ३६ एएम-७७२१) आरमोरी मार्गे देसाईगंजकडे ४ येत होता. दरम्यान, वडसा वन विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की हेल्मेटचा भुगा झाला व त्याचा उजवा पाय धडावेगळा झाला. दुचाकीही फरफटत गेली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळापासून २५ ते ३० फूट अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरु आहे.पित्याचा घातपाताचा आरोपश्रीकृष्ण वंजारी याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या घटनेनंतर कुटुंबीयास धक्का बसला आहे. सेवानिवृत्त वडील राजकुमार वंजारी यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAccidentअपघात