तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:28+5:30

राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्यांची नाेंद आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी धान बियाण्यांसाठी विविध वाणांची निवड करीत आहेत.

You just choose the seeds, give the variety in our opinion! | तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !

तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !

googlenewsNext

गाेपाल लाजूरकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी कृषी विभागाकडून ५० टक्के सुटीवरील बियाणे उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागताे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाने ठरविलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना परवान्यासह बियाणे खरेदी करावे लागते; परंतु ऑनलाइन पाेर्टलवर निवडलेली बियाणी शेतकऱ्यांना मिळतीलच याची शाश्वती नसते. ‘तुम्ही फक्त बियाणे निवडा, वाण आमच्या मताने देऊ !’ असाच प्रकार शेतकऱ्यांसाेबत दरवर्षी घडताे. 
राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्यांची नाेंद आहे. गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यामुळे शेतकरी धान बियाण्यांसाठी विविध वाणांची निवड करीत आहेत. त्याखालाेखाल कापूस, साेयाबीन तसेच तूर, तीळ पिकांच्या वाणांचीही निवड शेतकरी करीत आहेत. मागील वर्षी पाेर्टलवर जे वाण हाेते, तेच वाण याही वर्षी आहे. परंतु संपूर्ण वाण विक्रेत्यांकडे उपलब्ध राहत नाही. केवळ जाड प्रतीचे माेजके वाण विक्रेत्यांकडे उपलब्ध असते. 
मागील वर्षी शेतकऱ्यांसाेबत हा प्रकार माेठ्या प्रमाणात घडला. आपल्याकडे असलेले वाण शेतकऱ्यांना देऊन माेकळे करण्यात आले. हा प्रकार याहीवर्षी घडून शेतकऱ्यांची दिशाभूल हाेण्याची शक्यता आहे.

बियाणे मिळण्याची शाश्वती किती?
कृषी विभाग व जिल्हा परिषदमार्फत पंचायत समिती अंतर्गत बियाण्यांचे वाटप केले जाते. परंतु  पंचायत समितीवरील बियाणे केव्हा उपलब्ध असतात, याबाबत शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळत नाही तर महाडीबीटीवर नाेंदणी करूनही आपल्या नंबर बियाण्यांसाठी लागणार की नाही, याची शाश्वती कमीच असते.

बारीक वाण देण्यास हाेते टाळाटाळ 

कृषी विभागाने ठरविलेल्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडे धानाचे बारीक वाण उपलब्ध असते. शेतकऱ्यांनी पाेर्टलवर निवडलेल्या वाणांची मागणी जेव्हा विक्रेत्यांकडे केली जाते, तेव्हा त्यांच्याकडून नकार दिला जाताे. 
आपल्याकडे त्या धानाच्या जातीचे बारीक   वाण उपलब्ध नाही. जाड प्रतीचे वाण उपलब्ध आहे, असे सांगून बारीक वाण देण्यास टाळाटाळ केली जाते. परंतु गरजू शेतकरी याची वाच्यता कुठेही करीत नाही.

 

Web Title: You just choose the seeds, give the variety in our opinion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.