शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:07 IST

ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.

ठळक मुद्देशेकडो भाविकांचा सहभाग : भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सव

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.गडचिरोली शहर, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड परिसरातील सकल जैन समाजाच्या बंधूभगिनींनी स्थानिक मुख्य मार्गावरील साई मंदिरापासून सकाळी ७ वाजता भगवान महावीरांचा शांततेचा संदेश देणारी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजाच्या बंधूभगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या माता-पित्यांची वेशभूषा परिधान केलेल्या लहान मुला-मुलींनी आकर्षक देखावे साकारले होते.या उपक्रमास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवान महावीरांचा संदेश देणारी मिरवणूक चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात पोहोचली. या मिरवणुकीदरम्यान माहेश्वरी, गुजराती व राजस्थानी समाजातर्फे थंडपाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.मिरवणूक साई मंदिरात आल्यानंतर तिथे आयोजित कार्यक्रमात भगवान महावीरांच्या जन्मापूर्वी त्यांची माता त्रिशलादेवी यांना पडलेल्या शुभसूचक १४ स्वप्नांवरील नाटिका बालगोपाल व महिलांद्वारे सादर करण्यात आली. या दरम्यान मुरखळा येथील मुकबधिर व अपंग शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम सकल जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड येथील सकल जैन समाजाच्या बांधवांनी सहकार्य केले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८