शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
3
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
4
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
5
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
6
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
7
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
8
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
10
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
11
वैमानिकांची पळवापळवी! जॉइनिंगसाठी थेट ५० लाखांची ऑफर; इंडिगो आणि एअर इंडियामध्ये चुरस
12
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
13
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
14
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
15
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
16
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
17
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
18
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
19
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
20
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा हजार मजुरांना काम

By admin | Updated: June 4, 2014 00:04 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली.

चामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली. मे महिन्यात उपविभागात ३६ हजार ९६३ जॉब कार्ड वितरीत करून ६ हजार ५४८ मजुरांना चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात रोजगार देण्यात आला. या माध्यमातून आजपर्यंत ८१ हजार १८७ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली. चामोर्शी उपविभागातर्गत चामोर्शी तालुक्यात ७६ ग्रामपंचायती व मुलचेरा तालुक्यात १७ ग्रामपंचायती अशा एकूण ९३ ग्रामपंचायती आहेत. वित्तीय वर्ष २0१४-१५ च्या नियोजनात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ कामे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यापैकी ग्रामपंचायतस्तरावर ३ कामे व यंत्रणा स्तरावर दोन कामे सुरू करण्याचे आदेश तालुकास्तरीय वरीष्ठ अधिकार्‍यांना चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी दिले आहे. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील शेतकर्‍यांना पाण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून चामोर्शी तालुक्यातील २१0 विहिरी व मुलचेरा तालुक्याकरिता १00 विहिरींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तालुक्यात मजगीचे कामे मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले आहे. खरीप, रबी पिके मोठय़ा प्रमाणात शेतकरी घेऊ शकतील व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी यंत्रणा यांनी जास्तीत जास्त कामे सुरू करावी, मजुरांनी मोठय़ा प्रमाणात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करून रोजगार उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एन. देवेंदरसिंह यांनी केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी विभागात वित्तीय वर्ष २0१३-१४ मध्ये ८२६ कामे सुरू करण्यात आली होती. ही सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर २0१४-१५ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागात १९६ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्या दृष्टीने चामोर्शी उपविभागातील ९३ ग्रामपंचायतीमार्फ त उत्कृष्ठरित्या काम करण्यात आले आहे. गाव पातळीवर मजुरांना काम मिळावा या उद्देशाने उपविभागामार्फत यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील रोहयो मजुरांनी कामाची मागणी करून रोजगार उपलब्ध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.