शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

महिलांची दारूविक्री अड्ड्यावर धाड

By admin | Updated: January 3, 2015 01:15 IST

दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देऊनही गावात दारूविक्री सुरूच ठेवल्याने गावातील महिलांनी दारूविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूविक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

वैरागड : दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देऊनही गावात दारूविक्री सुरूच ठेवल्याने गावातील महिलांनी दारूविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूविक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्रीला बंदी घातली असली तरी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे दारूची खुलेआम विक्री केली जात होती. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागले होते. गावाचा व कुटुंबाचा विकास करण्यासाठी दारूविक्री बंद केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने कढोली येथील महिलांनी आठ दिवसांपूर्वी सभा घेऊन दारूविक्रीला प्रतिबंध करणारी स्वतंत्र समिती स्थापन केली. गावातील सर्वच दारूविक्रेत्यांना ३१ डिसेंबर २०१४ चा अल्टीमेटम दिला होता. मात्र पोलिसांशी संधान असल्याने निगरगट्ट व मुजोर झालेल्या दारूविक्रेत्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध दारूविक्री अड्ड्यांवर धाड टाकून दारू जप्त केली. दारूविक्रीविरोधात कारवाई केली जात असताना एका दारूविक्रेत्याने महिलेच्या बोटाचा चावा घेऊन जखमी केले. दारू पकडल्यानंतर याबद्दलची माहिती गावकऱ्यांनी कुरखेडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दारूविक्रेत्याला अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने महिलांनी दारूविक्रेत्याला अटक करण्याची मागणी लावून धरली. एवढेच नाही तर दारूविक्रेता पोलिसांच्या वाहनात बसण्यासाठी तयार नसतानाही पोलीस मात्र दारूविक्रेत्याला एखाद्या महत्वाच्या व्यक्तिप्रमाणे सौजन्याची वागणूक देत होते. पुढे पोलिसांचे वाहन, त्यामागे अवैध दारूविक्रेते, पोलीस व गावकऱ्यांची गर्दी अशा स्थितीत दारूविक्रेत्यांना गावाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दारूविक्रेत्याला गाडीत बसविले. महिलांनी २ जानेवारी रोजीसुद्धा काही दारूविक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धाड टाकून दारू जप्त केली. (वार्ताहर) कुरखेडा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्हमहिलांनी हिंमत करून पोलिसांना दारूविक्रेत्यांना पकडून देऊनही कुरखेडा पोलीस दारूविक्रेत्याला अटक करण्यास तयार नव्हते. त्याचबरोबर त्याला एखाद्या व्हीआयपी व्यक्तीप्रमाणे सौजन्याची वागणूक देत होते. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे कढोली परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे.