कुरखेडा-
जिल्हा पोलीस दल नागरिक कृती समिती यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे पार्कसन्स स्किल इन्सिट्यूट नागपूर यांच्या वतीने मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नर्सिंग प्रशिक्षण कोर्सची माहिती देऊन प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी परिसरातील १०५ मुली व महिला सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर होते.अतिथी म्हणून पार्कसन्स स्किल डेवलपमेंट इन्सिट्यूट नागपूरचे कोआर्डिनेटर योगेश रासेकर, ठाणेदार सुधाकर देडे, साहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने उपस्थित होते. १८ ते ३५ वयोगटातील मुली व महिलांकरिता शासनातर्फे सर्व खर्च करुन नि:शुल्क असलेल्या तीन महिन्याच्या प्रशिक्षणाची माहिती योगेश रासेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन साहिल नवाळे यांनी तर आभार पोलीस हवालदार उमेश नेवारे यांनी मानले.