शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला धडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:40 IST

कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली.

ठळक मुद्देअवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करा : पोलीस अधीक्षकांना राखी बांधून सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली.कुरखेडा तालुक्यातील तळेगाव, वाकडी व साधूटोला येथील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांना राखी बांधली व आपल्या समस्या सांगितल्या. पोलीस अधीक्षकांनीही महिलांनी आणलेल्या वचन कार्डवर स्वाक्षरी करून त्यांना दारू बंद करण्याचे वचन ओवाळणी म्हणून दिले.जिल्हाभरात गेल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवाना राखी बांधून ओवाळणी मागण्याचा कार्यक्रम मुक्तिपथतर्फे घेण्यात आला होता. हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५० तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्या. ओवाळणीमध्ये महिलांनी दारू बंद करण्याचे वचन मागितले. जिल्ह्यात २७ मार्च १९९३ पासून दारूबंदी आहे, परंतु अवैध रीतीने मिळणाऱ्या दारूमुळे आजही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी, सिरोंचा, मुलचेरा, कुरखेडा, एटापल्ली, अहेरी, चामोर्शी, कोरची, धानोरा व भामरागड येथील पोलीस मदत केंद्रे, सर्वच तालुक्यातील पोलीस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जाऊन पोलिसांना दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली.पोलिसांकडून कारवाईचे आश्वासनसिरोंचा तालुक्यातील आसरअली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी १५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करेन, असे वचनच भगिनींना दिले. कुरखेडा येथील पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी महिलांची साथ मिळाली, तर शंभर टक्के दारू बंद करू असे आश्वासन भगिनींना दिले. तर गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, भगिनींनी ओवाळणीच्या रुपात हक्काने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली, असे उद्गार काढले. भामरागड तालुक्यातील कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले. राजाराम येथील मदत केंद्रावरील पोलिसांनीही १० दिवसात दारू बंद करू असे वचन महिलांना दिले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस