शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अन् बंदूक चालविणारे हात पापड, लोणचं बनविण्यासाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 23:08 IST

आत्मसमर्पित महिला नक्षलींनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे, आरसेटी आणि जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम

- मनोज ताजनेगडचिरोली : गडचिरोलीच्या जंगलात मुक्तसंचार करत बिनधास्तपणे बंदूक चालविणाऱ्या, किंबहुना अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता चक्क पापड, लोणची, मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करणार आहेत. ही किमया जिल्हा पोलीस दल आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने घडविली.

 आत्मसमर्पित महिला नक्षलींच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी आनंदाने ते पूर्णही केले. नक्षल चळवळीत महिलांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. अजाणत्या वयात त्या नक्षल चळवळीत गेल्या, पण सज्ञान झाल्यानंतर पदरी पडली ती केवळ निराशा. त्यामुळे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत नवजीवनाला सुरुवात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शस्र ठेवले. पोलिसांच्या निगराणीत त्यांच्यासाठी गडचिरोलीत स्वतंत्र वसाहतही उभारण्यात आली. त्यातील महिला नक्षलवाद्यांनी स्वयंपूर्ण व्हावे, स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी त्यांना विविध पदार्थ तयार करण्याचे दहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

पोलीस विभागाच्या पुढाकाराने ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आरसेटी गडचिरोली यांनी हे प्रशिक्षण दिले.शुक्रवारी (दि.२३) या प्रशिक्षणाचा समारोप झाला. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), संस्थेचे संचालक चेतन वैद्य यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित महिला नक्षलींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. या प्रशिक्षणासाठी आत्मसमर्पण कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे, सहकारी भय्याजी कुळसंगे, मधुकर रत्नम आदींनी परिश्रम घेतले.आयुष्यात कधीच पापड बनविले नव्हतेएकेकाळी बंदूक हाती घेऊन दहशत पसरविणाऱ्या महिला नक्षली आत्मसमर्पणानंतर सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यांना महिलांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये तसेच व्यवसायातील स्पर्धा यांची जाणीव प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून देण्यात आली. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पापड, लोणचे बनविले नाही अशांनी स्वमर्जीने या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. केवळ वस्तू उत्पादन न करता त्याची बाजारात विक्री कशी करता येईल याचेही मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात आले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली