लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलपल्ली-आष्टी मार्गावरील लाभाणतांडा येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला मृत झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता घडली.पार्वती बालाजी पवार (२८) रा गडचांदूर जिल्हा चंद्रपूर असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक महिला व तिचा पती हा लाभानतांडा येथे काही कामानिमित्त येत होते वाटेतच बालाजी पवार यांच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली यात पार्वती ही जखमी झाली. तिच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संजय उमाटे यांनी प्राथमिक उपचार केले व तिला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.घटनास्थळावरून ट्रक पसार झाला. अद्याप त्याचा पत्ता लागला नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप, पोलीस हवालदार गजानन कोंडागुर्ले, बाबर शेख हे करीत आहे. सदर ट्रक हा बांबू ची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली आहे. महिलेचा पती बालाजी पवार जखमी असून अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.
दुचाकी अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:10 IST
आलपल्ली-आष्टी मार्गावरील लाभाणतांडा येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक महिला मृत झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता घडली.
दुचाकी अपघातात महिला ठार
ठळक मुद्देपती गंभीर जखमी : लाभाणतांडा गावाजवळची घटना