शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

कोरोनाच्या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा मातामायवर भरवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:38 IST

Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे.

ठळक मुद्देमातापूजन करण्याची परंपरा कायमकान्होलीतील महिला घालताहेत साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकट जनसामान्यांना जेरीस आणत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा स्थितीत गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे.

भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून डोक्यावर पाणी आणून गावातील मातामाय, हनुमान मंदिर या ठिकाणी वाहिले जात आहे. ग्रामदैवत असलेल्या मातामायवर महिला भरवसा करीत पूजाअर्चा करीत आहेत; पण ही संकल्पना पुरोगामी विचाराच्या लोकांना न पटण्यासारखी आहे. नागरिकांनी या पद्धतीच्या परंपरेत गुरफटून न राहता कोरोनाबाबत सांगितल्या जात असलेले नियम पाळले तर कोरोनाला दूर ठेवण्यात यश येईल, असे अनेकांना वाटते.

गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की मातापूजन करण्याची परंपरा आहे तसेच लग्न सोहळ्यापूर्वी मातामायला हळद नेली जात असते. एवढेच नव्हे तर गावातील कोणतेही संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ टाळ-मृदंग हाती घेऊन वाजतगाजत दिंडी काढत असतात. यातून आत्मिक समाधान लाभत असते, असा समज आहे. बदलत्या काळानुसार आज सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत असला तरी पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा आजही ग्रामीण भागात घट्ट बसून आहेत.

सध्या कोरोना संकटाची दुसरी लाट सुरू असून शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक या रोगाने भयभीत झालेले आहेत. गावात कोरोना संकट येऊच नये, यासाठी महिलांनी पुढाकार घेत माता पूजनचा निर्णय घेत वैनगंगा नदीवरून पाणी आणून मातामायची पूजा केली आहे. असा चार पाच दिवस पूजन चालणार असल्याची माहिती गावांतील महिलांनी दिली. यावेळी शांता चुनारकर, कमल झाडे, नंदा चुनारकर, शोभा चौधरी, नीता चुनारकर, छकुली चुनारकर, सोनी चुनारकर, छाया घोटेकर, पल्लवी चुनारकर, संतोषी झाडे, पारू फाले, ललिता फाले, निर्मला फाले, मालता चुनारकर, शेवंता झरकर, पुष्पा गोहणे, वंदना वडुले, मंदा सोनटक्के, कमला शेंडे, कासू शेंडे उपस्थित होते.

ग्रामदैवतांच्या पूजनाची जुनी परंपरा

गावात कोणतेही संकट येऊ नये यासाठी गावातील ग्रामदैवतांची पूजा करण्याची परंपरा अनादि काळापासून गावखेड्यात आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारात आजही मातामायची मंदिरे आहेत. काही गावांत पक्के बांधकाम केलेली तर काही गावांत निसर्गाच्या सानिध्यात मातामायचे मंदिरे आहेत. पूर्वी वैद्यकशास्त्र फारसे प्रगत नव्हते त्याकाळात कांजण्या, गोवर यासारखे आजार गावात यायचे. त्यातून रुग्णांची सुधारणा करण्यासाठी तालुकास्थळी जावे लागत असे. अशा परिस्थितीत गावातील ग्रामदैवतांची आराधना केली जायची, असे गावातील जाणकार सांगत असतात.

रोवणी हंगामात पाळतात पोलो

गावात खरीप हंगामातील धान पीक रोवणी हंगाम सुरू झाला की मंगळवार पोलो ही प्रथा आहे. रोवणी कामाला साप्ताहिक सुटी असते. पोलो असतो त्यादिवशी गावातील ग्रामदैवताची पूजाअर्चा केली जाते. किमान पाच मंगळवार पोलो पाळला जातो व शेवटच्या मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात त्याचा शेवट केला जातो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस