शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

बँकेतून १० लाखांपेक्षा जास्त रोकड काढताय? निवडणूक आयोगाची असेल करडी नजर

By दिलीप दहेलकर | Updated: April 1, 2024 10:54 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार, प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादाही ठरवून दिली.

- दिलीप दहेलकरगडचिराेली -  लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार, प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादाही ठरवून दिली. आता आयोग थेट निवडणूक कालावधीतील मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवत आहे. त्यामुळे सर्वांनाच बँकेतून पैसे काढताना काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक काळात बँकेतून दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास चाैकशी होणार आहे.दहा लाखांपेक्षा जादा रक्कम बँकेतून कुणी काढली, तर बँकांना त्याची माहिती तत्काळ आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. मोठी रक्कम काढून त्याचा व्यवस्थित हिशेब देऊ न शकल्यास कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढल्यास चौकशी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून संशयास्पद व्यवहारावर पूर्ण नजर आहे.

अवैध रक्कम आयकर विभागाकडे जाणारविविध पथकांनी जप्त केलेली रोख रक्कम सोडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कॅश रिलीज समिती स्थापन करण्यात आली आहे.पकडलेली रक्कम वैध दस्तऐवजांची पाहणी करून लगेच सोडण्यात येणार आहे. मात्र, अवैध रक्कम आयकर विभागाकडे जमा होणार आहे.बँकांच्या प्रशासनाने दहा लाखांपेक्षा अधिक व्यवहारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

‘एटीएम’वरही आहे वॉच- निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही वेळी तपासणी होण्याची शक्यता आहे. - एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या कॅशव्हॅन आणि सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बँकांना कॅशव्हॅनमध्येच ठेवावी लागेल. तसेच एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या रकमेची माहितीही सोबत ठेवावी लागेल.

काय म्हणतो नियम? - आरटीईजीद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम वळती झाल्यास, त्याची माहिती तत्काळ द्यावी लागणार आहे.-उमेदवार वा त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या खात्यातून एक लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च झाली किंवा जमा झाल्यास त्याचीही माहिती द्यावी लागेल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MONEYपैसा