लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील जुनी वडसा व हेटी वॉर्डात मागील दोन दिवसांपासून अस्वलाचा वावर सुरू आहे. पाण्याच्या शोधात शहराकडे आलेल्या या अस्वलाला अनेकांनी पाहिल्याने दहशत पसरली आहे. वनविभागाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनमजुरांनी अस्वलाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले आहे.उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात. त्यामुळे वन विभागाकडून वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. पण हे काम इमानदारीने होत नसल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेतात. जंगलातील कृत्रिम पाणवठे गायब झाल्यामुळेच हे अस्वल देसाईगंज शहरालगतच्या भागात दाखल झाले असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहराच्या जुनी वडसा, हेटी वॉर्डात या अस्वलाला अनेकांनी पाहिल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार यांनी पथकासह अस्वलाचा शोध घेऊन त्याला जंगलाच्या दिशेने पळविले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये अस्वलाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:58 IST
शहरातील जुनी वडसा व हेटी वॉर्डात मागील दोन दिवसांपासून अस्वलाचा वावर सुरू आहे. पाण्याच्या शोधात शहराकडे आलेल्या या अस्वलाला अनेकांनी पाहिल्याने दहशत पसरली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये अस्वलाचा धुमाकूळ
ठळक मुद्देपाण्याच्या शोधात निघाले प्राणीजंगलातील पाणवठे गायब?