शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

गडचिरोलीतीली गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:21 IST

संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

ठळक मुद्देसामाजिक दायित्व १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा प्रस्ताव लगेच मान्य करत गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) आणि दिभना (माल) या गावातील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. कामे बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गरीब, मजूर, निराधार, अपंग, निराधार विधवा महिला अशांची निवड केली. त्यांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ, चहाचे साहित्य आणि भाजीपाला अशा वस्तू देण्यात आल्या.या कामात त्यांना शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद पुन्नमवार सचिव सुरज बोरकुटे, भास्कर पेटकर, आकाश पोहनकर, श्रेयस जुमनाके, शुभम देवलवार आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. सदर साहित्य वाटप करताना दिभना (माल) गावचे सरपंच उमाकांत जुमनाके, ग्रामसेवक वासंती देशमुख तसेच नवेगाव (मुरखळा) गावचे ग्रामपंचायत सदस्य राजू खंगार व इतर नागरिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस