शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 16:51 IST

पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोरची (गडचिरोली) : कोरचीपासून पाच किलोमीटर अंतरावरील सातपुती गावाच्या रस्त्यावर रविवारी सायंकाळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका ट्रॅक्टरने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी खाली कोसळले. यात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी आहे. दुचाकीवरील कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते.

फुलेश्वरी झुमुक भेली (३८ वर्षे) असे मृत महिलेचे तर झुमुक भेली (४३) असे जखमी पतीचे नाव आहे. ते कोरची तालुक्याच्या कोचिनारा गावातील रहिवासी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कोचिनारा गावातील भेली दाम्पत्य छत्तीसगडच्या ढोडरी गावात अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अंत्यविधी झाल्यानंतर हे पती-पत्नी दुचाकीवरून गावी परत येत असताना हा अपघात घडला. कोचिनारा येथील समाजसेवक शमशेरखाँ पठाण यांनी फोनवरून कोरची पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तो ट्रॅक्टर गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातल्या कोसबी गावातील असल्याचे सांगण्यात येते. कोरची पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनात बेळगाव पोलीस मदत केंद्राचे पोउनि नितीश पोटे अधिक तपास करीत आहेत.

पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडले

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने (एम.एच. ३५, जी. ६४५७) त्यांच्या दुचाकीला (सी.जी. ०८, एस ८३४९) जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरचे चाक महिलेच्या अंगावरून गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. पतीला कोचिनारा गावातील लोकांनी प्राथमिक उपचाराकरिता कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रॅक्टरच्या चालकाने तेथून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला पकडले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू