शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आत्राम पिता- कन्येच्या लढाईत आता तिसरा उमेदवार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:12 IST

अम्ब्रीशरावांची दुहेरी कोंडी : महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महायुतीकडून अहेरीत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात कोण येणार, याची उत्सुकता होती. अखेर २४ ऑक्टोबरला महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कोट्यातून भाग्यश्री आत्राम (हलेगकर) यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता आत्राम पिता- कन्येच्या लढाईत तिसरा कोण मैदानात येतो, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

अहेरीचे राजकारण नेहमीच आत्राम राजपरिवाराभोवती फिरत आले आहे. येथे भाऊ-भाऊ, काका-पुतण्यानंतर आता पिता कन्या हे नवे राजकीय नाट्य रंगणार आहे. मागील दोन टर्मपासून धर्मरावबाबा यांचा सामना पुतणे अम्ब्रीशराव यांच्यासोबत होत आहे. मात्र, धर्मरावबाबा हे महायुतीत सामील झाले. 

महायुतीची मिळवत त्यांनी आघाडी घेतली. अम्ब्रीशराव यांनी धर्मरावबाबा यांच्याविरुध्द जाहीरपणे बंड पुकारले, पण राजकीय दिशा ठरली नाही. याच दरम्यान कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांशी बिनसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे स्वपक्षातीलच एक गट देखील नाराज असल्याची चर्चा आहे. आत्राम कन्या व पिता यांच्यातच सामना रंगणार की पिता- कन्येत तिसरा भिडू आखाड्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

दोन्हीकडे हुकली संधी, आता पुढची दिशा काय ? तथापि, अम्ब्रीशराव यांनी महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले, पण धर्मरावबाबा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेसकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी चाचपणी केली. मात्र, यश आले नाही. त्यामुळे त्यांची दुहेरी कोंडी झाली. आता ते इतर कोणत्या पक्षात प्रवेश करतात, की अपक्ष म्हणून मैदानात येतात, याची उत्सुकता आहे.

हणमंतु मडावींमुळे भाग्यश्री यांची अडचण दरम्यान, अहेरीची जागा आपल्याकडेच रहावी यासाठी काँग्रेस नेते अडून बसले होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अहेरीत मेळावा नुकतीच हणमंतु मडावी यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र, भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता हणमंतु मडावी हे बंडाचे निशाण फडकावण्याच्या तयारीत आहेत. निवृत्त सहायक उपवनसंरक्षक व काँग्रेस आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष असलेल्या हणमंतु मडावी यांच्या बंडखोरीचा भाग्यश्री आत्राम यांना जबर फटका बसू शकतो.

यापूर्वी अपयश भाग्यश्री आत्राम यांनी २०१४ मध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीकडून नशीब आजमावले होते. यात भाजपच्या डॉ. देवराव होळी यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. भाग्यश्री आत्राम यांनी १८ हजार २८० मते घेतली होती व दुसऱ्या स्थानी होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोलीaheri-acअहेरी