शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 6:00 AM

अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.

ठळक मुद्देसंडे अँकर । उमेदवारांच्या प्रतिमेसह नेत्यांच्या मेहनतीने यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीनही मतदार संघात भाजपने नव्या दमाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. भाजपच्या लाटेत त्यावेळी प्रथमच तीनही मतदार संघात या उमेदवारांनी बाजी मारली. पण यावेळी त्या उमेदवारांचा कस लागणे स्वाभाविक होते. उमेदवारांची वैयक्तिक कामगिरी आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा, भाजपच्या कार्यकर्त्यांचे बुथस्तरापर्यंतचे नेटवर्क, विविध उपक्रमातून केलेली पक्ष बांधणी आणि सत्ताधारी असल्यामुळे सरकारची प्रतिमा, अशा सर्वच बाजुने भक्कम असणे जिंकण्यासाठी आवश्यक होते. मात्र अहेरीत काही कमकुवत बाजूंमुळे निवडणूक जिंकण्याचे गणित बिघडले.अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.गडचिरोली आणि अहेरीत भाजपच्या विजयात प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा कमकुवतपणाही काही अंशी कामी आला. गडचिरोलीत भाजपच्या शिस्तबद्ध यंत्रणेपुढे काँग्रेसच्या नवख्या उमेदवार टिकाव धरू शकल्या नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून किशन नागदेवे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर तीनही उमेदवारांसाठी त्यांनी भाजपची फळी कामी लावली. अहेरीत बाजू कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर कमीत कमी वेळेत अमित शहांच्या सभेचे नियोजन केले. त्याचा फायदाही झाला, पण तो विजयात रुपांतरित होऊ शकला नाही.आरमोरीत वरकरणी निवडणूक सोपी वाटत असली तरी पुन्हा कौल मिळणे एवढे सोपे नव्हते. या मतदार संघाच्या सभोवती असलेल्या आमगाव, अर्जुनी मोरगाव, साकोली आणि ब्रह्मपुरी या चारही मतदार संघात भाजपला यश मिळाले नाही. अशा वातावरणात आरमोरीची जागा टिकवणे कठीण होते. मात्र भाजपच्या फळीसह सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन, प्रकाश पोरेड्डीवार यांनी किंगमेकरच्या भूमिकेत ठेवलेली पकड या जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे गजबे यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९ हजारांनी वाढले.पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात भाजपला अनपेक्षित फटका बसला. शेवटच्या टोकावरचा गडचिरोली जिल्हाही त्यासाठी अपवाद नाही. मात्र लगतच्या भागात भाजपने जागा गमावल्या असताना गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघाने पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना कौल दिला. त्या उमेदवारांच्या विजयाचे श्रेय कुणाचे आणि अहेरी मतदार संघातील पराजयाची जबाबदारी कुणाची, यावर आता काथ्याकूट सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली