शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत कधी होणार 'एमआरआय'ची सुविधा ? जिल्ह्यात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:02 IST

आर्थिक भुर्दंड : नागपूर, चंद्रपूरला घ्यावी लागते धाव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्रामीण व शहरी भागाची आरोग्य यंत्रणा काहीशी बळकट झाली असली तरी येथे अनेक आरोग्य सुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे येथील सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीनचा अभाव आहे. परिणामी, येथील रुग्णांना एमआरआय मशीनच्या साहाय्याने विविध रोगांचे निदान करून घेण्यासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. यापोटी त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात एमआरआयची सुविधा कधी होणार, असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.

कर्करोग, हृदयरोग, स्नायू आणि हाडांच्या विकृती तसेच नस दबणे, लकवा, वातरोग, मेंदूचे विकार, पाठीचा कणा, मणका व तत्सम रोगाच्या निदानासाठी एमआरआय मशीनने तपासणी करावी लागते. तेव्हाच परिपूर्ण निदान होते. त्यानंतर डॉक्टरांकडून औषधोपचार करता येतात.

गडचिरोली जिल्ह्यात दोन जिल्हा रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय आहेत. मात्र, या एकाही रुग्णालयात एमआरआय मशीनचा अभाव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना चंद्रपूर, ब्रह्मपुरी तसेच नागपूरला जावे लागते. यासाठी बराच पेसा व वेळ खर्च होतो. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीन शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. आरोग्याच्या या गंभीर बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या पाच वर्षांत गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजसह सर्व तालुका मुख्यालयाची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पाठ व मानदुखी व मणक्याचा त्रास वाढला आहे. परिणामी, अशा रुग्णांना एमआरआय मशीनने तपासणी करणे आवश्यक ठरते. मात्र, जिल्ह्यात कोणत्याच रुग्णालयात एमआरआय मशीनची सुविधा नसल्याने रुग्णांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. 

किती येतो रुग्णाला एमआरआयसाठी खर्च? एमआरआय करण्यासाठी रुग्णांना पाच हजारांपासून १० ते १२ हजार रुपयापर्यंत खर्च येतो. शरीराच्या कोणत्या व किती भागाचे एमआरआय करायचे आहे, यावर संबंधित खाजगी रुग्णालयाच्या वतीने शुल्क आकारले जाते. जाण्यायेण्याचा खर्च वेगळा येतो. एमआरआय करण्यासाठी जिल्हयातील नागरिकांना नागपूर, चंद्रपूर व ब्रम्हपुरीला जावे लागते. 

"गडचिरोली जिल्ह्यात गरीब कुटूंबांची संख्या मोठी आहे. अशा कुटूंबातील पाठदुखी, मणक्याचे आजार व तत्सम रोगासाठी मोठया शहरात जावून महागडी एमआरआय सुविधा मिळवू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात एमआरआय मशिन व तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे." - तुळशीराम सहारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य