शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

आरोग्य सेवक नियुक्तीचा मुहूर्त कधी निघणार? अंतिम निवड यादी घोषित होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:09 IST

Gadchiroli : जिल्हाभरातील पात्र उमेदवारांची घालमेल; जि.प. प्रशासनाविषयी नाराजी

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) पद भरतीअंतर्गत १२३ पदांच्या भरतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२३ पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे. 

आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी २४ जुलै २०२४ मध्ये म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. याद्वारे निवड झालेल्या नॉनपेसा उमेदवारांची १८ सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली; परंतु १४ ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानंतर शिल्लक जागेवर मेरिटनुसार नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट केले, तसेच पेसा उमेदवारांची ९ व १० डिसेंबर २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली नाही.

इतर जिल्ह्यांत नियुक्ती, गडचिरोलीत केव्हा?

  • ज्या उमेदवारांकडे २० दिवसांचे हंगामी फवारणीचे प्रमाणपत्र होते. अशा ९ उमेदवारांची यादी २७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
  • विशेष म्हणजे यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोदिया, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र गडचिरोलीत केवळ हंगामी २ उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी गुणवत्ताधारक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

६३ दीड वर्षापासून उमेदवारांचे हेलपाटेजागा पैसा क्षेत्र व ६० नॉनपेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी १ हजार १०० हून अधिक उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते.

शासन आदेशाचा अंमल केव्हा?

  • आरोग्य सेवक पदभरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रकरण उ‌द्भवल्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र ६ मार्च २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने १५ ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकाला अनुसरुन निर्णय दिला.
  • तसेच १२ मार्च २०२५ रोजी निवड प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. २८ मार्च रोजी नागपूर विभागीय आयुक्तांनी भरती प्रक्रियेस परवानगीचे आदेशही दिले; परंतु अजूनपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHealthआरोग्य