शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला पण फडणवीस म्हणाले, काळजी करू नका...अजित पवारांनी सांगितला प्रवासातील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 07:48 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने भर सभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले.

गडचिरोली : गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जाताना नागपूरपर्यंत ठीक वाटले, पण नंतर हेलिकॉप्टर ढगात शिरले,   इकडं पाहतोय ढग, तिकडं पाहतोय ढग, जमीन दिसेना, झाडंही दिसेना... पोटात गोळा आला, आज आषाढी एकादशी... पांडुरंगा, पांडुरंगा असे नाव घेत होतो, पण देवेंद्र फडणवीस हे काळजी करू नका... असे उपदेश देत निश्चिंत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने भर सभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले.

त्याचे झाले असे, १७ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री द्वयींचा नियोजित गडचिरोली दौरा होता. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रा. लि. कंपनीच्या दहा हजार कोटी गुंतवणुकीच्या स्टील निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पार्थ पवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उदय सामंत व पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने निघाले, पण सकाळपासूनच गडचिरोलीत ढग दाटून आले होते. खराब वातावरणामुळे फडणवीस व पवार हे कार्यक्रमास येतील की नाही, अशी काळजी वाटत होती, असे मंत्री आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासातील किस्सा सांगितला. 

‘ढगात चाललोय की आणखी कुठं’

हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर बाहेर काहीच दिसत नव्हते. फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते. मी त्यांना म्हणालो, अहो, बाहेर काहीच दिसत नाही, आपण ढगात चाललोय की आणखी कुठं चाललोय काही कळेना. त्यावर ते म्हणाले, माझे सात अपघात झाले आहेत, मात्र माझ्या नखालाही धक्का लागलेला नाही, तुम्हालाही काही होणार नाही, काळजी करू नका... यावर भर सभेत हशा पिकला, तर फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.

नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात गडचिरोलीतूनच 

nवर्षभरापूर्वी अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी होत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवा राजकीय पट मांडला होता.

nसत्तानाट्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे गडचिरोलीत पहिल्यांदाच एकत्रित आले होते. जाहीर सभेला संबोधित करत त्यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

nगडचिरोली दौऱ्यातील हेलिकॉप्टर प्रवासातील गमतीदार किस्सा सांगून अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत तूर्त राजकीय सुरक्षित प्रवास सुरू असल्याचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस