शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

वनकायद्यात अडकलेल्या सात प्रकल्पांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे. वनबाधित प्रकल्पांपैकी तुलतुली प्रकल्पाचा वनप्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देसिंचनाचा अभाव : जाचक अटींमुळे सरकारदरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित; अनेक प्रकल्प आहेत अपूर्ण

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची देण असूनही बारमाही सिंचनापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वनकायदा एक शाप ठरत आहे. वनकायद्याच्या जाचक अटींची पूर्तता करणे शक्य न झाल्यामुळे प्रस्तावित ७ सिंचन प्रकल्पांचे काम अनेक वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे.वनबाधित प्रकल्पांपैकी तुलतुली प्रकल्पाचा वनप्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. पण या प्रकल्पासाठी १ लाख ९९ हजार झाडे तोडावी लागत असल्यामुळे ३ ऑगस्ट १९९९ आणि ९ एप्रिल २००० च्या पुनर्विलोकन वन प्रस्तावास मंजुरी नाकारण्यात आली आहे. कारवाफा प्रकल्पाच्या प्राथमिक स्वरूपाच्या कामांना १९८० मध्ये सुरूवात केली होती, परंतू वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मे १९८३ पासून प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. १९८५ मध्ये वन प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी नाकारली. ७ गावांच्या ग्रामसभांपैकी ३ गावांच्या (रेखाटोला, कुथेगाव आणि कोंदावाही) ग्रामसभेने ठरावास नामंजुरीची शिफारस केली.चेन्ना प्रकल्पासाठी ९ मे २०१७ रोजी वनप्रस्ताव सादर करण्यात आला. वनजमिनीच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून दिलेले ७४५.४८ हेक्टर क्षेत्र (गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्हा) अंदाजे २० वर्ष जुने असल्याने सद्यस्थितीत ते क्षेत्र वनीकरणास उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत संबंधित उपवनसंरक्षकांकडून नव्याने प्रमाणपत्र घेणे आवश्यक झाले आहे.पिपरी रिट आणि पुलखल या प्रकल्पांची प्राथमिक स्वरूपाची कामे झाली होती. डुमीनाला प्रकल्पात वाढ झालेले २१.१६ हेक्टर क्षेत्र पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध न झाल्यामुळे वनप्रस्तावाच्या कार्यवाहीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच प्रकल्पबाधित बारसेवाडा गावाच्या ग्रामसभेचा ठराव नकारात्मक असून तो सकारात्मक व्हावा यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून पाठपुरावा होणे आवश्यक आहे. डुरकानगुड्रा प्रकल्पासाठी ४ पैकी ३ ग्रामसभांचा ठराव सकारात्मक तर चुडीयाल या एका ग्रामसभेचा ठराव नकारात्मक आहे. त्यासाठीही पाठपुरावा गरजेचा आहे.पर्यायी जमिनीचा अभाववन कायद्यानुसार कोणत्याही सरकारी विभागाला वनजमीन घ्यायची असल्यास त्या जमिनीपेक्षा दुप्पट पर्यायी जमीन वनविभागाला द्यावी लागते. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. त्यामुळे प्रकल्पांसाठी वनजमीन घेताना पर्यायी जमीन म्हणून वनविभागाला देण्यासाठी दुप्पट जागा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यामुळे हे प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकले नाही. शेजमिनीला बारमाही सिंचन मिळून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पर्यायी जमिनीची अट शिथील केल्यास हे प्रकल्प मार्गी लागू शकतात. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण