गडचिरोलीत आजपासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:29+5:30

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा प्रथमच दोन हजारांच्या टप्प्यावर गेला. २ हजार ८६ बाधितांपैकी १ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र १४ जणांना जीवही गमवावा लागला.

Week 'Janata Curfew' in Gadchiroli from today | गडचिरोलीत आजपासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’

गडचिरोलीत आजपासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १४ कोरोनाबळी : नवीन ९३ बाधितांची भर, तर ५६ रुग्ण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील कोरोनाच्या प्रसाराला आवर घालण्यासाठी व्यापारी आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार पुकारलेल्या आठवडाभराच्या ‘जनता कर्फ्यू’ला बुधवार (दि.२३) पासून सुरूवात होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील मार्केट विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गजबजून गेले होते. दरम्यान एका आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू होण्यासोबतच ९३ नवीन रुग्णांची बुधवारी भर पडली आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा प्रथमच दोन हजारांच्या टप्प्यावर गेला. २ हजार ८६ बाधितांपैकी १ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र १४ जणांना जीवही गमवावा लागला.
नवीन ९३ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३३ जण आहेत. त्यामध्ये आयटीआय चौक ४, नवेगाव कॉम्प्लेक्स २, जिल्हा परिषद कर्मचारी ७, सोनापूर कॉप्लेक्स १, विवेकानंदनगर ३, चामोर्शी रस्ता १, पोर्ला १, कन्नमवार वार्ड १, सर्वोदय वार्ड २, पोलीस स्टेशन १, इंदिरा नगर १, गणेश कॉलनी १, अयोध्यानगर १, एसआरपीएफ ४, हनुमान वार्ड १ व चंद्रपूर जिल्ह्यातील २ जणांचा समावेश आहे. अहेरीतील १४ जण आहेत. त्यात अहेरी शहर ५, आलापल्ली २, महागाव ५, बोरी १, चेरपल्ली १ जण याप्रमाणे आहेत. देसाईगंज तालुक्यातील ६ जणांमध्ये आमगाव १ आणि देसाईगंज शहरातील ५ जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील दोघांमध्ये शहरातील १ व मिछगावमधील १, आरमोरी तालुक्याच्या ११ मध्ये शहरातील ५, डोंगरगाव ३, आंबेशिवणी १, अरसोडा १, सिर्सी १ यांचा समावेश आहे. याशिवाय सिरोंचा ३, कोरची ६, कुरखेडा १०, चामोर्शी १, एटापल्ली ३, भामरागड २ तथा मुलचेरा येथील २ जणांचा समावेश आहे.

खरेदीसाठी झाली मार्केटमध्ये गर्दी
आठवडाभराच्या जनता कर्फ्यूमध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंसह भाजी विक्रीही बंद राहणार असल्याचे सांगितल्यामुळे शहरवासियांनी मंगळवारी बाजारात चांगलीच गर्दी केली होती. विविध वस्तूंच्या खरेदीसह गुजरीच्या भाजी मार्केटमध्येही संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वर्दळ कायम होती. संध्याकाळी ७ वाजता शहर पोलिसांनी सायरन वाजवत चकरा मारल्यामुळे मार्केटमधील दुकानदारांनी आवरते घेतले.

जि.प.अध्यक्षांवर नागपुरात उपचार
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना आधी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. पण श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून अलिकडे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Week 'Janata Curfew' in Gadchiroli from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.