शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात आढळले नक्षल्यांचे शस्त्रसाहित्य, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:29 IST

पोलिसांनी सतर्कता बाळगल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्ती येथील घनदाट जंगलात ३ सप्टेंबरला राज्य राखीव पोलिस दल व ग्यारापत्ती पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाच्या दरम्यान शस्त्र साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी तीन रायफल जप्त केल्या आहेत.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील ग्यारापत्ती जंगलक्षेत्रात नक्षल्यांची रेलचेल राहिली आहे. तेथे अनेकदा पोलिस व नक्षल्यांत धूमश्चक्री झाल्या आहेत. दरम्यान, ३ सप्टेंबरला राज्य राखीव दलाची तुकडी व ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राचे जवान गस्त घालत होते. यावेळी जंगलातील एका झोपडीत तीन रायफल आढळून आल्या. या रायफल नक्षल्यांच्या असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

यावेळी परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबविली, पण नक्षली किंवा अन्य संशयित आढळून आले नाहीत. दरम्यान, अलीकडेच नक्षल्यांचा शहीद सप्ताह पार पडला. मात्र, पोलिसांनी सतर्कता बाळगल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ग्यारापत्ती जंगलात शस्त्र आढळल्याने पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ही शस्त्रे नेमकी कोणाची, याबाबत तपास सुरू आहे, असे उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली