जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर माेहझरी गाव आहे. गावात २००च्या आसपास कुटुंब आहेत. या गावाचा समावेश नवरगाव गट ग्रामपंचायतमध्ये हाेताे. गावात २० वर्षांपूर्वी अंतर्गत रस्ते व नालीचे बांधकाम करण्यात आले. काही वर्षांनंतर येथील रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. वर्षानुवर्ष रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली. रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आले. परंतु तेसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आले नाही. सध्या नाल्या पूर्णत: बुजलेल्या आहेत. गटग्रामपंचायत प्रशासन गावात मूलभूत साेयीसुविधा पुरविण्याकडे तसेच गावातील विकास करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावात तीन हातपंप व दोन विहिरी आहेत. याच जलस्त्राेतांचे पाणी नागरिकांना प्यावे लागते. येथे नळयाेजना कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली; परंतु मागणीकडे दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून येथील रस्त्याचे नूतनीकरण करावे तसेच नालीचे बांधकाम नव्याने करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपाली लोमेश लांबाडे, नागरिक चंद्रभान महामंडरे, शाळा समिती उपाध्यक्ष लोमेश लांबाडे, शाळा समिती सदस्य मारोती मेश्राम, संदीप जुमनाके, कालिदास लांबाडे, करीम शेख, फिरोज शेख, शबिर शेख, रामदास महामंडरे, चंद्रकांत महामंडरे, धनपाल महामंडरे, गणेश महामंडरे, मंगेश मेश्राम, नीलकंठ मेश्राम आदी उपस्थित होते.
बाॅक्स
राेजगारासाठी स्थलांतर
माेहझरी येथे राेेेेजगाराचे साधन नसल्याने नागरिकांना राेजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करावे लागते. शासकीय याेजनांच्या लाभापासून गावातील नागरिक वंचित राहतात. येथील नागरिकांचा काैटुंबिक विकास अद्यापही झाला नाही. सध्या गावातील जवळपास ६० कुटुंबातील व्यक्ती मिरची ताेडणीसाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे गावात मूलभूत साेयीसुविधा पुरविण्यासह विकासात्मक कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.