दुकानगाळे लिलावाची बेरोजगारांना प्रतीक्षा

By Admin | Updated: May 17, 2014 23:39 IST2014-05-17T23:39:45+5:302014-05-17T23:39:45+5:30

सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पोंभूर्णा येथे आठ दुकान गाळ्यांचे सन २००९ ते २०१० या कालावधीत बांधकाम करण्यात आले

Wait for unemployed for sale auction | दुकानगाळे लिलावाची बेरोजगारांना प्रतीक्षा

दुकानगाळे लिलावाची बेरोजगारांना प्रतीक्षा

 ंदेवाडा(खुर्द) : सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पोंभूर्णा येथे आठ दुकान गाळ्यांचे सन २००९ ते २०१० या कालावधीत बांधकाम करण्यात आले. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात आले नाही. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या गाळ्यांचा त्वरित लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये कुठलेही औद्योगिक क्षेत्र नसल्याने बेरोजगारांची फौज वाढत आहे. भावी पिढीला सक्षम करण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार केला. त्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे हे युवक शासकीय नोकरीची मागणी करू लागले आहेत. मात्र प्रत्येक युवकास शासकीय नोकरी देणे शक्य नसल्याने त्या युवकांनी स्वत:चा रोजगार करावा व त्या माध्यमातून इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी या योजनेची फलश्रृती आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे रोजगार सुरू करण्यासाठी दुकानाची जागा खरेदी करणे आणि त्यावर इमारत बांधणे, दुकानाचे साहित्य खरेदी करणे शक्य नसल्यामुळे या युवकांना शासनाकडून दुकान गाळे बांधून दिल्यास त्या ठिकाणी ते रोजगार थाटू शकतील. या उद्देशाने पंचायत समिती पोंभूर्णा अंतर्गत सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेअंतर्गत २० टक्के मुलभूत सुविधा अंतर्गत २००९ ते २०१० या कालावधीत आठ दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र सदर गाळे बेरोजगार युवक व महिला बचत गटांना अजूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले नाही. दुकान गाळ्यांच्या बांधकामासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च झाले आहे. गावात दुकान गाळ्यांचे बांधकाम होत असताना अनेक युवकांनी या ठिकाणी रोजगार थाटण्याचे स्वप्न पाहिले. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अजूनपर्यंत बांधकाम केलेल्या गाळ्यांचे वाटप स्थानिक लाभार्थ्यांना करण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाप्रती युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याकडे लक्ष देऊन दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Wait for unemployed for sale auction