शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कडक पोलीस बंदोबस्ताने मतदान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:28 IST

भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. पोलीस विभागाने मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस विभागाने नागरिकांना केले होते.

ठळक मुद्देनक्षल शोधमोहीम केली तीव्र : भामरागड पोलिसांनी मतदानाचे महत्त्व पटविले

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुक्यातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. पोलीस विभागाने मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच बिनधास्तपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस विभागाने नागरिकांना केले होते. त्यामुळे रखरखत्या उन्हातही भामरागड तालुक्यातील जनतेने मतदान केले. परिणामी मतदानाची टक्केवारी वाढली आहे.नक्षल्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडून घातपाताच्या घटना घडवून आणल्या जातात. अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर नागरिक मतदान करणार नाही, असा त्यांचा अंदाज राहतो. नक्षल्यांचा हा बेत हाणून पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस संरक्षणातच पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या. मतदानाच्या १५ दिवसांपूर्वीपासूनच नक्षल शोधमोहीम राबवून मतदान केंद्राच्या परिसरातील जंगल पोलिसांनी पिंजून काढला होता. पोलिसांचे नियोजन व वाढलेली ताकद लक्षात घेऊन नक्षल्यांच्याही मनात धडकी भरली.गावातील नागरिकांच्या घरी जाऊन लोकशाहीमध्ये मतदानाचे असलेले महत्त्व पटवून दिले. प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार प्रत्येक व्यक्तीने बजावावा. नक्षल्यांच्या धमक्यांना भीक घालू नये, पोलीस सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत, असे आवाहन केले. त्यामुळे नागरिक मतदानासाठी तयार होऊन बिनधास्तपणे मतदान केले. दुर्गम भागातील पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरने बेस कॅम्पपर्यंत पोहोचविण्यात आल्या. हेलिकॉप्टरच्या सभोवतालही पोलिसांचा कडक पहारा होता. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे भामरागडसारख्या नक्षलग्रस्त भागातील मतदान शांततेत पार पडले. यासाठी एसडीपीओ तानाजी बरडे यांच्यासह ताडगावचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहूल नामदेवे, महिला पीएसआय पुनम गोरे, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर मुनीर खान, हरिश्चंद्र मनोरी यांनी नियोजन केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस