लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोंदावाहीनजीकच्या बोदीन येथील ग्रामस्थांनी दोन भरमार बंदूक व चार भरमार बॅरल पोलीस मदत केंद्रात गुरूवारी जमा केले.गोडलवाही पोलीस मदत केंद्र हे अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त दुर्गम भागात मोडत असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सदर परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामभेट नक्षलविरोधी अभियान व जनजागरण मेळावे राबविण्यात आले. तसेच भेटीदरम्यान ग्रामस्थांनी आपल्याकडील भरमार बंदुका पोलीस मतद केंद्रात जमा करून नक्षलवादाला विरोध करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. पोलीस अधिकाºयांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी भरमार बंदुक व बॅरल पोलिसांकडे सुपूर्द केले. सदर उपक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस अधिकारी गजानन गोटे, पोलीस उपनिरीक्षक खारगे, वाडीवा आदींनी सहकार्य केले.यापूर्वी या भागातील पदाबोरिया, मिचगाव, हिपानेर, पॉवरव्हेल येथील ग्रामस्थांनी २२ भरमार बंदुका व १३ भरमार बॅरल गोडलवाही पोलीस मदत केंद्रात जमा केल्या. २५ जुलै २०१७ रोजी ११ बंदुका, तसेच १२ आॅक्टोबर रोजी दोन बंदुका ग्रामस्थांनी पोलीस मदत केंद्रात जमा केल्या. गोडलवाही पोलीस मदत केंद्रात सन २०१७ या वर्षात आतापर्यंत ४१ भरमार बंदुका व १९ भरमार बॅरल ग्रामस्थांनी जमा केल्या. येथील पोलीस अधिकाºयांच्या प्रयत्नामुळे गोडलवाही पोलीस मदत केंद्राला नक्षलवादाविरोधात यश आले आहे.
ग्रामस्थांनी भरमार बंदुका केल्या जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:55 IST
तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोंदावाहीनजीकच्या बोदीन येथील ग्रामस्थांनी दोन भरमार बंदूक व चार भरमार बॅरल पोलीस मदत केंद्रात गुरूवारी जमा केले.
ग्रामस्थांनी भरमार बंदुका केल्या जमा
ठळक मुद्देपोलिसांना यश : बोदीनवासीयांचा नक्षलवादाला विरोध