शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

राजोलीवासीयांनी अडविले खासदार व आमदारांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:35 PM

कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देअर्धवट पुलाने रहदारीस अडथळा : पाच कोटी निधी देण्याचे खासदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागण्यांना मान देत आमदार व खासदारांनी पुलाची पाहणी केली. या पुलाच्या पूर्ण बांधकामासाठी पाच कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले.खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी हे रविवारी धानोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षणाला गेले होते. आमदार व खासदार आल्याची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य महागू वाडगुरे, माजी सरपंच लाला गेडाम, ग्रामसभा सदस्य मनोहर गुरनुले यांच्या नेतृत्वात राजोलीवासीयांनी धानोरा गाठले. आमदार व खासदार यांना घेराव घालून पुलाच्या गंभीर स्थितीबाबत अवगत केले. प्रत्यक्ष पुलाची पाहणी केल्याशिवाय नागरिकांच्या समस्या लक्षात येणार नाही, ही बाब राजोलीवासीयांनी खासदारांना पटवून दिली. प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.त्याचबरोबर पूल बांधकामासाठी निधी देण्याबाबत निवेदनही सादर केले. खासदार व आमदारांनी प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन पुलाची पाहणी केली. पूल अर्धवट असल्याने विद्यार्थी व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. समस्येची गंभीरता लक्षात घेऊन पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.अशी आहे कठाणी नदीवरील पुलाची दयनीय स्थितीधानोरा तालुकास्थळापासून ८ किमी अंतरावर असलेल्या राजोली येथील कठाणी नदीवर २०१५ साली बांधलेला पूल अर्धवट आहे. या पुलामुळे राजोलीवासीयांना धानोरा येथे जाण्यासाठी ५ किमीचे अंतर कमी झाले. अन्यथा नागरिकांना नवरगाव-सोडे मार्गे यावे लागत होते. कंत्राटदाराने पूल बांधताना तो अगदी नदीच्या काठापर्यंत बांधणे आवश्यक होते. मात्र काठापर्यंत पूल बांधला नाही. पुलाजवळील पिचिंग व्यवस्थित केली नाही. परिणामी काठाजवळील माती वाहून गेली. त्याचबरोबर दरवर्षी नदीकाठाचा विस्तार होत असल्याने पूल व नदीचे काठ यामध्ये जवळपास आता ५० फुटांचे अंतर पडले आहे. पूल व नदीची पातळी यामध्ये खड्डा निर्माण झाला आहे. पाऊस पडून नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर ५० फुटाच्या अंतरात पाणी राहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद राहते. पूल ते नदीपात्र जवळपास १० फूट अंतर आहे. प्रशासनाने तीन फूट उंचीचे सिमेंट पाईप टाकले आहेत. त्यावर गावातील नागरिक दरवर्षी सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून बॅग पाईपवर ठेवतात. अशा पद्धतीने पुलावरून उतरले जाते. मात्र दुचाकी किंवा चारचाकी नेणे अशक्य होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी