शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१३२० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी मोटारपंप लावून भाजीपाला पिकाची शेती फुलविली. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीतही गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व आरमोरी, चामोर्शी या तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत गावठी भाजीपाल्याची कमतरता भासली नाही.

ठळक मुद्देउन्हाळी हंगाम : शासकीय योजनेतून सिंचन सुविधा निर्माण झाल्याने लागवडीचे क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा धान शेतीसाठी प्रसिद्ध असला तरी गेल्या तीन, चार वर्षांपासून या जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. विशेष करून येथील शेतकरी रबी हंगामात अर्थात उन्हाळ्यामध्ये निघणाऱ्या भाजीपाला पिकाची लागवड करतात. सन २०१९-२० या चालू उन्हाळी हंगामात भामरागड व एटापल्ली हे दोन तालुके वगळता इतर दहा तालुक्यात एकूण १ हजार ३२०.७० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली.धडक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनेतून मिळणारी विहीर, शेततळे, कृषीपंप आदी छोट्या-मोठ्या सिंचन सुविधांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार, पाच वर्षात घेतला. जलयुक्त शिवार योजनेतूनही जिल्ह्यात सिंचन सुविधा निर्माण झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी मोटारपंप लावून भाजीपाला पिकाची शेती फुलविली. त्यामुळे कोरोनाच्या संचारबंदीतही गडचिरोली जिल्हा मुख्यालयी व आरमोरी, चामोर्शी या तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत गावठी भाजीपाल्याची कमतरता भासली नाही.यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्हाभरात एकूण १५ हेक्टर क्षेत्रावर टरबूज पिकाची लागवड करण्यात आली. १२४.५० हेक्टरवर मिरची, २२५.६० हेक्टर क्षेत्रावर वांगी, १६३.१० हेक्टरवर कारले, १२९.१० हेक्टरवर टमाटर, ७.६० हेक्टर क्षेत्रावर पत्ता कोबी, ५८.२० हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी, १०३.६० हेक्टरवर भेंडी तर ६६.६० हेक्टर क्षेत्रावर चवळी पिकाची लागवड करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यात पालेभाज्यांचेही उत्पादन बऱ्यापैकी होते. यंदाच्या उन्हाळी हंगामात पालक, मेथी, कोथिंबीर, आंबाडी, गव्हार आदी पिकाची लागवड करण्यात आली. २८ हेक्टरवर पालक, २ हेक्टरवर मेथी, २२.३५ हेक्टरवर कोथिंबीर पिकाची लागवड करण्यात आली. १३५ हेक्टर क्षेत्रावर गव्हार तसेच २२.५० हेक्टर क्षेत्रावर इतर पालेभाज्यांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात ६१. १० हेक्टर क्षेत्रावर कांदे पिकाची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानभामरागड व एटापल्ली तालुका वगळता इतर दहा तालुक्यात २०१९-२० वर्षातील उन्हाळी हंगामात बºयाच शेतकºयांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. वैरागडसह ग्रामीण भागातील भाजीपाला कोरोना लॉकडाऊनच्या काळात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी तालुका मुख्यालयी विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र १० मे च्या पहाटेच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. यापूर्वीसुद्धा तीन ते चार वेळा अधूनमधून पाऊस बरसला. पावसामुळे टमाटर पिकाचे नुकसान झाले. शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी व इतर पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले. आधीच संचारबंदीने भाजीपाला उत्पादक शेतकºयांना अल्प भाव मिळत आहे. त्यात पुन्हा पावसाने तडाखा दिला.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती