शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

६४० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:09 IST

शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे.

ठळक मुद्देउन्हाळी हंगाम : सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर वांग्याचे पीक बहरले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील रबी हंगामात जिल्हाभरात एकूण ६४० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १३६ हेक्टर क्षेत्रावर वांग्याचे पीक बहरले आहे.गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, मुलचेरा व एटापल्ली हे तीन तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये शासन प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रमाणात सिंचन सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच काही प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन सिंचन विहीर खोदली. त्यावर मोटारपंप बसवून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील अनेत शेतकरी आता खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात दुबार पिके घेत आहेत. गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी व चार तालुक्यात मिळून रबी हंगामात २१ हेक्टर क्षेत्रावर टरबुजाची लागवड करण्यात आली. ८० हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक आरमोरी तालुक्यात ५८ हेक्टर इतके मिरची पिकाचे क्षेत्र आहे.१३६ हेक्टर क्षेत्रावर वांगी पिकाची लागवड करण्यात आली. आरमोरी तालुक्यात ६९ हेक्टर, त्याखालोखाल देसाईगंज व गडचिरोली तालुक्याचा क्रमांक लागतो. ७७ हेक्टर क्षेत्रावर कारले, तर ८६ हेक्टर क्षेत्रावर टमाटर पिकाची लागवड करण्यात आली.६० हेक्टर क्षेत्रावर पताकोबी व २४ हेक्टर क्षेत्रावर फुलकोबी पिकाची लागवड करण्यात आली. नऊ हेक्टर क्षेत्रावर कोथिंबीर तर २० हेक्टर क्षेत्रावर कांद्याचे पीक घेतले जात आहे. एकूण ५३ हेक्टर क्षेत्रावर इतर प्रकारच्या भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे. दुबार पिकामुळे शेतकरी प्रगतीवर आहेत.आरमोरी तालुका आघाडीवरआरमोरी तालुक्याच्या वैरागड, वासाळा, वनखी, भाकरोंडी व इतर परिसरात सिंचनाच्या सुविधा शेतकºयांनी निर्माण केल्यामुळे या भागात दोन्ही हंगामात पिके घेतली जात आहेत. यंदाच्या रबी हंगामात आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २७१ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मिरची, वांगी, कारले, टमाटर, फुलकोबी, भेंडी आदींचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यानंतर देसाईगंज व त्याखालोखाल गडचिरोली व कुरखेडा तालुक्याचा भाजीपाला पिकाचा क्रमांक लागतो.६१ हेक्टरवर भेंडीचे पीक, सिरोंचा तालुक्यातही लागवडनागरिकांकडून भेंडीच्या भाजीला अधिक पसंती आहे. त्यामुळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात भेंडी खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणच्या बाजारात नागरिक गर्दी करतात. यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्याच्या सात तालुक्यातील एकूण ६१ हेक्टर क्षेत्रावर भेंडी पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १४ हेक्टर, आरमोरी तालुक्यात २४ हेक्टर, चामोर्शी ६ हेक्टर, सिरोंचा १२ हेक्टर, देसाईगंज ३ हेक्टर, अहेरी तसेच कोरची तालुक्यात एक हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

टॅग्स :vegetableभाज्या